Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Thalassemia Day का साजरा केला जातो? रक्तासंबंधित गंभीर आजारांची लागण झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ लक्षणे

दरवर्षी जगभरात सगळीकडे ८ मे रोजी जागतिक थॅलेसेमिया दिन साजरा केला जातो. थॅलेसेमियाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांच्या संघर्षांचा सन्मान करण्याच्या दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो.

  • By सुरुची कदम
Updated On: May 06, 2026 | 09:37 AM
जागतिक थॅलेसेमिया दिन का साजरा केला जातो? रक्तासंबंधित गंभीर आजारांची लागण झाल्यानंतर दिसून येतात 'ही' लक्षणे

जागतिक थॅलेसेमिया दिन का साजरा केला जातो? रक्तासंबंधित गंभीर आजारांची लागण झाल्यानंतर दिसून येतात 'ही' लक्षणे

Follow Us
Follow Us:

दरवर्षी ८ मे रोजी जागतिक थॅलेसेमिया दिन साजरा केला जातो. हा दिवस थॅलेसेमियाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांच्या संघर्षांचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे. या व्यतिरिक्त हा दिवस थॅलेसेमियाग्ग्रस्त लोकांसाठी चांगल्या आरोग्य सेवा सुनिश्चित करण्यासाठीच्या जागतिक प्रयत्नांवर प्रकाश टाकतो.(फोटो सौजन्य – istock)

केवळ दारूचं नाहीतर दैनंदिन जीवनातील ‘या’ गोष्टी लिव्हर खराब करण्यास ठरतात कारणीभूत, वेळीच व्हा सावध

थॅलेसेमिया म्हणजे काय?

थॅलेसेमिया हा एक अनुवांशिक रक्त विकार आहे. याचा शरीराच्या पुरेसं आणि निरोगी हिमोग्लोबिन तयार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशींमधील प्रथिन आहे, जे फुफ्फुसांमधून शरीराच्या इतर भागात ऑक्सिजन वाहून नेतं. जेव्हा शरीर पुरेसं हिमोग्लोबिन तयार करू शकत नाही, तेव्हा तीव्र स्वरूपाचा अॅनिमिया होतो, ज्यामुळे थकवा, अशक्तपणा आणि इतर विविध आरोग्य समस्या उद्भवतात.

जेव्हा हिमोग्लोबिन बनवणाऱ्या जनुकांपैकी एकामध्ये असामान्यता किंवा उत्परिवर्तन होते तेव्हा थैलेसेमिया होतो. जर तुमच्या पालकांना हा आजार असेल तर तुम्हाला या आजार होऊ शकतो. थॅलेसेमिया हा आशिया, मध्य पूर्व, आफ्रिका आणि भूमध्यसागरीय देश जसे की ग्रीस आणि तुकिं मधील लोकांमध्ये सर्वसामान्य आहे.अॅनिमिया टळण्यासाठी काही रुग्णांना ठराविक काळाने रक्त चढवावे लागते, तसेच रक्त स्वीकारल्यामुळे लोहाचे प्रमाण वाढल्यावर ते कमी करण्यासाठी काही उपचार घ्यावे लागतात.

काही रुग्णांमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांटचे उपचार केले जातात. तसेच ते अत्यंत महाग असून भारतात हा उपचार सहज होणं तितकं शक्य नाही. बीटा थॅलेसेमियामध्ये बीटा ग्लोबिन साखळींचे उत्पादन प्रभावित होते, जे अधिक गंभीर असू शकते. अल्फा थॅलेसेमिया यामध्ये अल्फा ग्लोबिन साखळीचे उत्पादन कमी होते. वेगवेगळ्या उपचार पद्धतीच्या आधारे आजारावर निदान केले जाते.

थॅलेसेमियाची गंभीर लक्षणे?

सतत सर्दी आणि खोकला
सतत अशक्तपणा आणि उदासपणा
श्वास घेण्यात अडचण
अनेक प्रकारचे संक्रमण होणे
शरीरात सतत पिवळसरपणा दिसणे
दात बाहेर येणे
क्यानुसार शारीरिक विकासाचा अभाव

कटकट वाजणारे सांधे होतील मजबूत! कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

थॅलेसेमियावर आयुष्यभर उपचार घ्यावे लागतात किंवा त्यांना विशिष्ट प्रकारची काळजी घ्यावी लागते.सकस आहार, योग्य व्यायाम सुचवला जातो तसेच कोणत्याही व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला रुग्णांना दिला जातो. हा जन्मजात आजार असल्यामुळे दर ३-४ आठवड्यांनी रक्त चढवणे, याशिवाय शरीरातील लोहाची पातळी कमी झाल्यानंतर ‘आयर्न चेलेशन थेरपी’ इत्यादी उपचार केले जातात.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जागतिक थॅलेसेमिया दिन का साजरा केला जातो?

    Ans: थॅलेसेमिया या आनुवंशिक रक्तविकाराबद्दल जनजागृती करण्यासाठी आणि रुग्णांना मदत करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

  • Que: थॅलेसेमिया म्हणजे काय?

    Ans: थॅलेसेमिया हा एक आनुवंशिक (genetic) रक्तविकार आहे ज्यामध्ये शरीरात हिमोग्लोबिन योग्य प्रमाणात तयार होत नाही.

  • Que: थॅलेसेमियाची लक्षणे कोणती?

    Ans: थकवा, अशक्तपणा, पांढरट त्वचा, श्वास घेण्यास त्रास, वाढ खुंटणे ही लक्षणे दिसू शकतात.

Web Title: Why is world thalassemia day celebrated these symptoms appear after contracting serious blood related diseases

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 09:37 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue

संबंधित बातम्या

Health Update: शस्त्रक्रियेत मज्जातंतूंवर नजर; इजा होताच इशारा! पालिका रुग्णालयांत अत्याधुनिक ‘नर्व्ह मॉनिटरिंग’ प्रणाली
1

Health Update: शस्त्रक्रियेत मज्जातंतूंवर नजर; इजा होताच इशारा! पालिका रुग्णालयांत अत्याधुनिक ‘नर्व्ह मॉनिटरिंग’ प्रणाली

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
2

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Health Update: Ovarian Cyst म्हणजे कॅन्सर नाही? रजोनिवृत्तीपूर्वी अंडाशयातील गाठींबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती
3

Health Update: Ovarian Cyst म्हणजे कॅन्सर नाही? रजोनिवृत्तीपूर्वी अंडाशयातील गाठींबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
4

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.