रक्त आणि रक्तातील घटकांचे संक्रमण ही आरोग्य देखभाल क्षेत्रातील एक सर्वसामान्य प्रक्रिया आहे. शरीरातील अवयवांना पुरेशा प्रमाणात प्राणवायूचा पुरवठा होत राहावा, रक्ताभिसरणाचे प्रमाण पुन्हा पूर्ववत करण्यासाठी आणि रक्त गोठवणारे घटक आणि रक्तातील इतर घटकांच्या ऐवजी म्हणून रक्त संक्रमण केले जाते.
वैद्यकीय कर्मचारी रक्तदात्यांची तपासणी करतात. रक्तदानपूर्व कौन्सेलिंगमध्ये खूप जास्त धोकादायक बाबी, दात्याची मेडिकल हिस्ट्री याबाबत चर्चा आणि शारीरिक तपासणी यांचा समावेश असतो. त्यानंतरच रक्तदान केले जाते. सर्वात आधी दात्याला फ्लेबॉटॉमीसाठी नेतात, जिथे संक्रमणासाठी रक्त जमा करण्याबरोबरीनेच रक्ताचे नमुने पायलट ट्यूब्समध्ये गोळा केले जातात (गोठलेले आणि अँटीकोग्युलेटेड).
रक्तदान सुरक्षितपणे व्हावे यासाठी लॅबोरेटरी डायग्नॉस्टिक्सची भूमिका खूप महत्त्वाची असते. रक्ततपासणीमुळे रुग्णाच्या रक्तगटाप्रमाणे योग्य रक्तगट निवडण्यात मदत होते, अशाप्रकारे रक्त संक्रमणामुळे शरीराकडून विरोधी प्रतिक्रिया दिली जाण्याचा धोका कमी होतो. दात्याकडून रक्त स्वीकारणाऱ्या व्यक्तीला संसर्ग होणे टाळण्यात देखील मदत होते. डॉ. मधुरा जोगवार, लॅब चीफ, मेट्रोपॉलिस हेल्थकेयर लिमिटेड (मुंबई) यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock)
पहिली तपासणी हिमोग्लोबिनची
दान करण्यात आलेल्या रक्तावर अनेक लॅबोरेटरी तपासण्या केल्या जातात, यापैकी पहिली तपासणी हिमोग्लोबिनची केली जाते. दात्याचे हिमोग्लोबिन १२ ग्राम/डीएल पेक्षा कमी असता कामा नये. त्यानतरच रक्तदान करता येऊ शकते.
डायग्नॉस्टिक्सची भूमिका महत्त्वपूर्ण
रक्त संक्रमणातून पसरू शकतात अशा संसर्गजन्य आजारांची तपासणी करण्यात लॅबोरेटरी डायग्नॉस्टिक्सची भूमिका महत्त्वपूर्ण असते. यांना संक्रमणातून पसरणारे आजार म्हणतात. या आजारांची काही वैशिष्ट्ये म्हणजे ते रक्तामध्ये निर्माण होतात, रक्तामध्ये दीर्घकाळपर्यंत असतात आणि रक्तातून पसरतात, त्यांची काहीही क्लिनिकल लक्षणे दिसून येण्याआधीचा इन्क्युबेशन कालावधी खूप मोठा असतो.
लॅबोरेटरीत रक्त तपासणी आवश्यक
बऱ्याचदा, रक्तदानाच्या वेळी दात्यामध्ये अशा आजारांची काहीही लक्षणे दिसून येत नाहीत. रुग्णाला बऱ्याच मोठ्या प्रमाणात रक्त किंवा रक्तातील घटक दिले जातात, संसर्गजन्य ऑरगॅनिजम थोड्या प्रमाणात जरी संक्रमित केले जात असतील तरी आजार संक्रमित होऊ शकतो. एचआयव्ही, हिपॅटायटिस बी विषाणू, हिपॅटायटिस सी विषाणू, सिफिलिस आणि मलेरिया यासारख्या संसर्गजन्य आजारांचे विषाणू नाहीत याची खात्री करून घेण्यासाठी जमा केलेल्या रक्ताची तपासणी करण्यासाठी लॅबोरेटरी तपासण्या खूप उपयोगी ठरतात. कोणतेही युनिट पॉझिटिव्ह आढळल्यास संपूर्ण रक्त किंवा रक्तातील घटक रद्दबातल ठरवले जातात. सुरक्षित रक्त संक्रमणासाठी हे गरजेचे आहे.
HIV तपासणी
सुरुवातीला रक्तदात्यांची फक्त एचआयव्ही तपासणी केली जात असे. पण वैद्यकीय ज्ञान वाढत गेले आणि लक्षात आले की, हिपॅटायटिस बी आणि सी हेदेखील रक्तामध्ये निर्माण होणारे पॅथोजेन आहेत आणि त्यामुळे त्यांचा समावेश दान करण्यात आलेल्या रक्ताच्या तपासणीमध्ये करण्यात आला. या तपासण्या एलिसा किंवा एलिसा इम्युनोअसे टेस्ट्समार्फत केल्या जातात, त्यासोबत रॅपिड इम्युनोक्रोमॅटोग्राफी केली जाते, त्यामुळे रक्त संक्रमणाची संपूर्ण प्रक्रिया रक्त स्वीकारणाऱ्या व्यक्तीसाठी सुरक्षित बनते.
संवेदनशील विषय
एलिसा, इम्युनोअसेवर आधारीत तपासण्या आणि रॅपिड इम्युनोक्रोमॅटोग्राफीमार्फत एचआयव्ही १ आणि २ साठी रक्ताची तपासणी केली जाते. या तपासण्या संवेदनशील आहेत पण विंडो कालावधीमध्ये रुग्ण ओळखू शकत नाहीत.
लॅबोरेटरी तपासण्यांमध्ये भरपूर प्रगती होत आहे, त्यामुळे आता एचआयव्ही, एचबीव्ही आणि एचसीव्ही यासाठीच्या तपासण्या न्युक्लेईक ऍसिड टेस्टिंग वापरून केल्या जातात. या टीटीआयसाठी दान केलेल्या रक्ताची तपासणी करण्यासाठी हे आण्विक तंत्र आहे. एनएटी आल्यामुळे रक्तामध्ये निर्माण होणाऱ्या विषाणूंचा विंडो कालावधी लक्षणीय प्रमाणात कमी झाला आहे, त्यामुळे रक्त स्वीकारणाऱ्या रुग्णांची सुरक्षितता वाढली आहे.
[read_also content=”जागतिक रक्तदाता दिन का साजरा केला जातो? काय आहे या वर्षाची थीम https://www.navarashtra.com/lifestyle/world-blood-donor-day-importance-history-and-significance-know-the-2024-theme-547848/”]
सिफिलिस – मलेरियासाठी
याखेरीज सिफिलिस आणि मलेरियासाठी रक्ताची तपासणी केली जाते. सिफिलिस हा आजार ट्रेपोनेमा पॅलिडम या विषाणूमुळे होतो. दान करण्यात आलेल्या प्रत्येक रक्ताची सिफिलिससाठी सेरॉलॉजिकल टेस्ट व्हीडीआरएल/आरपीआर पद्धतीने आणि गरज भासल्यास टीपीएचएने करणे गरजेचे आहे.
मलेरिया हा आजार परजीवींमुळे होतो आणि दान करण्यात आलेल्या सर्व रक्ताची मलेरियासाठी संवेदनशील अँटीजेन टेस्ट केली गेली पाहिजे. रक्तामध्ये मलेरिया परजीवी आहेत अथवा नाहीत हे तपासण्यासाठी याआधी स्मीयर रिव्ह्यू आणि मायक्रोस्कोपी केली जात असे.
TTI तपासणी
टीटीआयसाठी लॅबोरेटरी टेस्ट्स करण्याबरोबरीनेच अँटी-ए, अँटी-बी आणि अँटी-एबी रेंजेन्ट्ससह आणि ए, बी आणि ओ पूल सेल्स/जर उपलब्ध असतील तर पॅनल सेल्ससह अपेक्षित आणि अनपेक्षित अँटीबॉडीजसाठी सिरम किंवा प्लाझ्मा तपासून लाल रक्तपेशींची तपासणी करून एबीओ ग्रुप निश्चित केले जातात. अँटी डी रेंजेन्ट वापरून आरएच (डी) टाईप निश्चित केला जातो.
रक्त गट अँटिजेन्सचे प्रकार निश्चित केल्याने रक्त संक्रमण प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि सुधारित होतात, खास करून ज्या रुग्णांना सतत रक्ताची गरज भासते त्यांच्यासाठी हे उपयुक्त ठरते. गरज भासल्यास, जमा करण्यात आलेले रक्त स्टरिलिटी टेस्टिंगसारख्या मायक्रोबायोलॉजिकल स्टडीजसाठी पाठवले जाऊ शकते.
सुरक्षित रक्तदान महत्त्वाचे
रक्तदान सुरक्षित असावे यासाठी लॅबोरेटरी डायग्नॉस्टिक्सची भूमिका खूप महत्त्वाची असते. डायग्नॉस्टिक्समध्ये नवनवीन तंत्रज्ञान आले आहे, त्यामुळे रक्त संक्रमणातील सुरक्षितता वाढली आहे. त्यामुळे स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्यांची संख्या वाढू शकेल व अनेक लोकांचे जीव वाचवले जाऊ शकतील.