रक्तदानाला सर्वात महान दान म्हणतात. रक्तदान केल्याने अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होते. अनेक जीवघेण्या वैद्यकीय परिस्थितीत, दान केलेल्या रक्ताच्या मदतीने रुग्णाचे प्राण वाचवले जातात. त्यामुळे रक्तदानासारख्या गोष्टींसाठी लोकांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जातो. रक्तदानाच्या उदात्त हेतूबद्दल लोकांना जागरुक करण्यासाठी दरवर्षी 14 जून रोजी World Blood Donor Day साजरा केला जातो. जागतिक रक्तदाता दिवस दरवर्षी का साजरा केला जातो आणि या वर्षाची खास थीम काय आहे ते जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pixabay)
का साजरा केला जातो World Blood Donor Day?
वैद्यकीय क्षेत्रातील रक्तदानाच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे कारण या दिवशी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले जातात, जे लाखो लोकांचे प्राण वाचविण्यास मदत करतात. त्यामुळे लोकांना या दिवशी रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. अनेक जण नियमितपणे दर ३ ते ६ महिन्यांनी रक्तदान करतात, त्यांच्यासाठीही हा दिवस खास मानला जातो.
कधी आणि कोणी केली सुरूवात?
1940 मध्ये शास्त्रज्ञ रिचर्ड लोवर यांनी दोन कुत्र्यांमध्ये कोणतेही दुष्परिणाम न करता प्रथम यशस्वी रक्त संक्रमण केले. या चाचणीच्या आधारे मानवामध्ये रक्त संक्रमणाचे तंत्रही विकसित करण्यात आले. यानंतर, 2005 मध्ये जागतिक आरोग्य असेंब्लीने 14 जून हा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आणि तेव्हापासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. यंदा हा दिवस साजरा करायला लागून 20 वर्षे पूर्ण होत आहेत.
[read_also content=”कल्याण पूर्वेला रक्तदान शिबिराचे आयोजन https://www.navarashtra.com/maharashtra/organized-blood-donation-camp-in-kalyan-east-large-participation-of-citizens-539911/”]
यावर्षीची थीम काय आहे?
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने आपल्या संकेतस्थळावर सांगितल्यानुसार “दानाची 20 वर्षे साजरी करणे: रक्तदात्यांचे आभार!” ही या वर्षीची थीम आहे. या थीमद्वारे, लाखो रक्तदात्यांचे आभार मानले जात आहेत, ज्यामुळे हेल्थ इंडस्ट्री सुरळीतपणे रक्ताचे संक्रमण करू शकत आहे. यासोबतच WHO ने सांगितले आहे की, या दिवसाच्या माध्यमातून नियमित रक्तदानाची जागरूकता वाढवण्यासाठी आणि तरुण आणि सामान्य लोकांमध्ये रक्तदानाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
‘रक्तदान हेच जीवनदान’ असे म्हटले जाते. तुम्हीही नियमितपणे रक्ताचे दान करून एखाद्याचा जीव वाचवू शकते. त्यामुळे याची योग्य माहिती घ्या आणि आजच शुभदिनी रक्तदानाला सुरूवात करा!