चॉकलेट खायला कोणाला आवडत नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत चॉकलेट सर्वांच्या आवडीचा. कोणाला खुश करायचे असो वा आपल्या प्रेमाची कबुली द्यायची असो चॉकलेटचा अनेक प्रकारे वापर केला जातो. तसेच यापासून अनेक गोड पदार्थदेखील बनवले जातात. तुम्ही अनेक प्रकारचे आणि वेगवेगळेया किमतीचे चॉकलेट चाखले असेल मात्र तुम्हाला माहित आहे का? जगात असेही चॉकलेट आहे जे खरेदी खरेदी करण्यासाठी तुमची आयुष्यभराची सेविंगदेखील कमी पडेल. आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात महागडं चॉकलेट कोणतं याविषयी सविस्तर माहिती संगत आहोत. याची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल.
जगातील सर्वात महागड्या चॉकलेटविषयी बोलणं केलं तर ते आहे, ‘ले चॉकलेट बॉक्स’. या चॉकलेटचा दर्जा हा त्याला पाहिल्यावरच दिसून येतो. या चॉकलेटची विशेष गोष्ट म्हणजे याचा अनोखा चॉकलेट बॉक्स.. याला हिऱ्याचे हार, बांगड्या-पन्ना आणि नीलमणी बनवलेल्या अंगठ्या आहेत. त्यामुळे हे चॉकलेट खूपच खास आहे. सॉफ्ट आणि स्पेशल चवीसाठी प्रसिद्ध असलेले हे चॉकलेट कोणीही सहजासहजी खरेदी करू शकत नाही.
तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, ले चॉकलेटच्या एका बॉक्सची किंमत एकूण 1.5 दशलक्ष डॉलर इतकी आहे. या पैशांना जर आपण भारतीय रुपयांमध्ये मोडले तर याची किंमत एकूण 10.94 कोटी रुपये इतकी आहे. याप्रमाणेच डेन्मार्कमधून आलेले निप्सचिल्ड चॉकोलेटियरचे चॉकलेट ट्रफल हे चॉकलेट देखील सर्वाधिक किमतीच्या यादीत येते. या चॉकलेट ट्रफलची एकूण किंमत 2,600 डॉलर एवढी आहे आणि याची किंमत भारतीय रुपयांत 1,89,498 रुपये इतकी आहे. हे महागडे चॉकलेट बनवण्यासाठी 28 दुर्लभ प्रकारच्या गोष्टींचा वापर करण्यात येतो.
हेदेखील वाचा – काळाकुट्ट झालेला कुकर होईल आरशाप्रमाणे साफ, फक्त हे घरगुती उपाय करून पहा
या चॉकलेटमध्ये कोको, गोल्ड लीफ आणि ला मॅडेलीना ऑ ट्रफल या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे नोका चॉकलेटदेखील बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आले आहे. सर्वात महागडे चॉकलेट म्हणून या चॉकलेटची फोर्ब्स मॅगझिनमध्ये नोंद करण्यात आली आहे. याच्या किमतीबद्दल बोलणे केले तर याची एकूण किंमत 330 डॉलर म्हणजे तब्बल भारतीय रुपयांमध्ये 24602 रुपये आहे.