कशी उघडकीस आली घटना?
मृत सोमनाथ आणि श्रीदेवी हे दोघे सोलापुरातील कलावती नगर येथील रहिवासी आहे. त्यांना दोन मुली देखील आहेत. धनश्री ही दहा वर्षाची तर डेंच्या ही सहा वर्षांची अशी दोघांची नावे आहेत. शुक्रवारी (दि.२७) सकाळी सहाच्या सुमारास सोमनाथ आणि श्रीदेवी हे दोघे घरात बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांच्या तोंडातून फेस येत असल्याचे त्यांच्या मुलींनी पाहिले. ते पाहताच त्यांनी घाबरून लगेच आपल्या काकांना फोन करून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच त्यांचे काका नागनाथ हे घटनास्थळी आले. त्यांनी दोघांना लगेच श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सोमनाथ पाटील यांचा पूर्वी शेळीपालनाचा व्यवसाय होता नंतर त्यांनी घरातच किराणा दुकान सुरू केले होते. शवविच्छेदनानंतर दुपारी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.
निंबूत परिसरातील गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
कारण काय?
प्राथमिक माहितीनुसार आर्थिक अडचणी किंवा कौटुंबिक कारणांमुळे हा प्रकार घडला असावा, अशी चर्चा परिसरात सुरु आहे. त्यांच्या मृतदेहाची शवविच्छेद अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. ही हत्या आहे आत्महत्या याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान दोघांच्या मृतदेहाजवळ एक चिट्ठी सापडल्याची माहिती समोर आली आहे. मात्र पोलिसांनी त्याबाबत दुजोरा दिलेला नाही आहे. मात्र पोलिसांनी घटनास्थळावरून काही वस्तू जप्त केले आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहे. या घटनेमुळे कलावती नगर परिसरात शोककळा पसरली आहे.
प्रेम विवाह केला, मुलगीही झाली, पत्नी माहेरी गेली, मात्र…; तरुणाचे टोकाचे पाऊल
सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २८ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव प्रेम अंकुश जाधव असे आहे. भाऊ ऐनवेळी धावून आल्याने आणि शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला शासकीय रुग्णलयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरने त्याला मृत घोषित केले. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने व्हिडिओ देखील बनवला आहे.
Ans: सोलापूर शहरातील कलावती नगर परिसरात ही घटना घडली.
Ans: नाही, आत्महत्या की घातपात याबाबत तपास सुरू असून अहवालानंतरच कारण स्पष्ट होईल.
Ans: घटनास्थळावरील वस्तू जप्त करून विविध अंगांनी तपास केला जात आहे.






