(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे दोघं सध्या त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. नुकताच त्याचा विवाहसोहळा उदयपूर येथ थाटामाटात आणि पारंपारिक पद्धतीने पार पडला. या दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातल आहेत. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघे 26 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकले. गीता गोविंदम या चित्रपटात रश्मिका आणि विजय यांनी पहिल्यांदा एकत्र काम केले होते. तेव्हापासून ते एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. या चित्रपटात एकत्र काम केल्यानंर ही दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील एक सुपरहिट जोडी ठरली. प्रेक्षकांना दोघांची केमिस्ट्री प्रचंड आवडते. लग्नानंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करणार असून त्यांच्या नवीन चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे. विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या “राणाबल्ली” या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक खास पोस्टर रिलीज केले,
मिथ्री मूव्ही मेकर्सने इंस्टाग्रामवर आगामी तेलुगू चित्रपट “राणाबल्ली” चे नवीन पोस्टर रिलीज केले. पोस्टरमध्ये एक मुलगा आणि मुलगी हात धरलेले दिसत आहे. रश्मिका आणि विजय दोघेही चित्रपटात आहेत, त्यामुळे हे हात रश्मिका आणि विजयचे असू शकतात.
विजय आणि रश्मिका यांच्या लग्नानंतर “राणाबल्ली” या चित्रपटाबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. चित्रपटाच्या निर्मात्यांनी रश्मिका आणि विजयच्या लग्नाच्या एक दिवसानंतर “राणाबल्ली” चे पोस्टर रिलीज करून चाहत्यांचा उत्साह आणखी वाढवला आहे. निर्मात्यांनी पोस्टरला “आमची “राणाबल्ली” आणि जयम्म” असे कॅप्शन दिले आहे. पुढे, निर्मात्यांनी लिहिले, “२८ फेब्रुवारी रोजी एक खास सरप्राईज तुमची वाट पाहत आहे. तुम्ही पुन्हा त्यांच्या प्रेमात पडाल.”
डिअर कॉमरेड’ चित्रपटानंतर विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना पुन्हा एकदा “राणाबल्ली” मध्ये एकत्र दिसणार आहेत. विजय आणि रश्मिका अभिनीत “राणाबल्ली” हा चित्रपट राहुल सांकृत्यन यांनी दिग्दर्शित केला आहे. हा रायलसीमाच्या इतिहासावर आधारित एक ऐतिहासिक नाट्यमय चित्रपट आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडा “राणाबल्ली” ची भूमिका साकारत आहेत आणि रश्मिका मंदान्ना ‘जयम्मा’ची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात हॉलिवूड अभिनेता अर्नोल्ड वोसलू खलनायकाची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट ११ सप्टेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होत आहे.
ज्यामध्ये फक्त “राणाबल्ली” आणि जयम्माचे हात दाखवले आहेत. निर्मात्यांनी आज, शनिवारी काहीतरी खास शेअर करण्याचे आश्वासन दिले आहे. “राणाबल्ली” चित्रपटातील काहीतरी खास कधी प्रदर्शित होईल ते जाणून घ्या?






