जांभूळ खाल्ल्यानंतर बिया फेकून देत असाल तर थांबा! बियांचा वापर करून सोप्या पद्धतीमध्ये बनवा नॅचरल हेअर कलर
तरुण वयात केस पांढरे झाल्यानंतर ते काळे करण्यासाठी स्त्रिया वेगवेगळ्या हेअर ट्रीटमेंट, हेअर कलर तर काहीवेळा हेअर डाय सुद्धा लावतात. पण वारंवार हेअर कलर केल्यामुळे केस कोरडे होण्याची शक्यता असते. केसांची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी अनेक उपाय केले जातात. केसांना आवश्यक पोषक घटक न मिळाल्यामुळे केसांची मूळ कमकुवत होतात आणि केस गळणे, केस तुटणे तर काहीवेळा केसांमध्ये कोंडा होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे तरुण वयात केस पांढरे होऊ नये म्हणून केसांची खूप जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. सतत हेअर कलर किंवा हेअर डाय केल्यामुळे केसांच्या मुळांना हानी पोहचते. त्यामुळे पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय करावेत.(फोटो सौजन्य – istock)
सध्या बाजारात मोठ्या प्रमाणावर जांभळं उपलब्ध झाली आहेत. जांभळाचे सेवन केल्यास शरीराला खूप जास्त फायदे होतात. रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी जांभूळ किंवा जांभळाच्या बियांची पावडर खाण्याचा सल्ला दिला जातो. जांभळं विकत आणल्यानंतर खाऊन आतील बिया फेकून दिल्या जातात. पण असे न करता बियांचा वापर करून तुम्ही नॅचरल हेअर कलर घरीच बनवू शकता. हा हेअर कलर केल्यानंतर केस चमकदार दिसण्यासोबतच केसांची शाईन वाढेल. जांभळाच्या बियांचा वापर करून हेअर कलर बनवल्यास केसांना नॅचरल बरगंडी कलर दिसेल.
जांभळाच्या बियांचा वापर करून हेअर कलर बनवण्यासाठी सर्वप्रथम, बिया पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. बिया स्वच्छ धुवून झाल्यानंतर कडक उन्हात सुकण्यासाठी ठेवा. सुकलेल्या बिया मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पावडर बनवा. या बियांची पावडर केवळ केसांसाठीच नाहीतर वजन कमी करण्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरेल. लोखंडी कढईमध्ये जांभळाच्या बियांची पावडर आणि पाणी घालून मिक्स करा. रात्रभर तयार केलेले मिश्रण तसेच ठेवून घ्या. तयार केलेला हेअर कलर केसांवर लावून २ ते ३ तास तसाच ठेवून द्या. यामुळे पांढरे केस नॅचरली पर्पल- बरगंडी रंगाचे दिसतील. जांभळाच्या बियांमध्ये असलेले घटक केस आतून मजबूत करण्यास मदत करतात.
वय राहिलं फक्त एक नंबर! चेहऱ्यावरील सर्व सुरकुत्या होतील दूर, त्वचाही होईल मऊ; फक्त ही 1 गोष्ट वापरा
आपल्यातील अनेकांना कायमच केसांना वेगवेगळा रंग करण्याची सवय असते. पण कायमच केमिकल युक्त हेअर कलर करण्याऐवजी नॅचरल हेअर कलर करून केसांची काळजी घ्यावी. केस पांढरे झाल्यानंतर ते पुन्हा एकदा चमकदार करण्यासाठी जांभळाच्या बियांचा वापर करून बनवलेला हेअर कलर वापरावा. याशिवाय कोमट पाण्यात जांभळाच्या बियांची पावडर मिक्स करून प्यायल्यास वाढलेले वजन नियंत्रणात राहील आणि रक्तात इन्सुलिनची पातळी वाढणार नाही.






