कोणते पदार्थ आतडे कुजवू शकतात (फोटो सौजन्य - iStock)
आतडे निरोगी राहणे खूप महत्वाचे आहे. आतड्यांमध्ये काही समस्या असल्यास त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. उन्हाळ्यात मसालेदार, तेलकट पदार्थ खाल्ल्याने आम्लपित्त, पोटदुखी आणि जळजळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात. काही गोष्टी अशा असतात ज्या आतड्यांना पचवण्यास कठीण असतात. त्या गोष्टी जास्त वेळ खाल्ल्याने आतडे हळूहळू खराब होऊ लागतात. आतड्यांना आतून नुकसान करणाऱ्या पदार्थांबद्दल Medical News Today ने दिलेल्या अहवालानुसार जाणून घेऊया.
आहारामध्ये नक्की काय खावे आणि काय खाऊ नये हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. अनेक प्रक्रिया केलेले अन्न हे आतडे सडवते आणि त्याचा त्रास होऊ शकतो. हे पदार्थ नक्की कोणते आहेत आणि तुमचे आतडे कसे चांगले राहील याची आपण या लेखातून अधिक माहिती घेऊया (फोटो सौजन्य – iStock)
लाल मांस
रेड मीट खाऊ नये
लाल मांस खाणे आतड्यांसाठी धोकादायक ठरू शकते. विशेषतः सॉसेजसारखे प्रक्रिया केलेले लाल मांस खाल्ल्याने आतडे आतून कुजू लागतात. खरं तर, प्रक्रिया केलेल्या उंदराच्या मांसामध्ये सोडियम, रसायने आणि संरक्षकांचे प्रमाण जास्त असते, जे आतड्यांना हानी पोहोचवू शकते. लाल मांस अर्थात रेट मीट खाणे अनेकांना त्रासदायक ठरते. तुम्ही नियमित याचे सेवन करत असाल तर तुम्हाला त्वरीत सावध होण्याची गरज आहे
रात्री केलेल्या चुका सडवू शकतील तुमचे आतडे, समजल्यावर त्वरीत बदला सवय
जंक फूड्स
जंक फूड्स खाणे टाळावे
आजकाल लोकांना जंक फूड खायला आवडते, विशेषतः शहरात राहणारे लोक बहुतेकदा पिझ्झा, बर्गर, केक, बिस्किटे इत्यादी खातात. या गोष्टींमध्ये जास्त प्रमाणात सोडियम आणि चरबी असतात, ज्यामुळे आतड्यांवर वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे आतड्यांना नुकसान होऊ शकते. मैद्याने बनलेले पदार्थ खाण्यावर हल्ली भर वाढला आहे. त्यामुळे हे पदार्थ आपण आपल्या आहारातून कमी करणे आवश्यक आहे. आतड्यांवर याचा भार येण्याआधी तुम्ही पदार्थांचे सेवन कमी करावे
डीप फ्राईड फूड्स
तळलेल्या पदार्थांचे सेवन करणे त्रासदायक ठरेल
जास्त तळलेले पदार्थ खाल्ल्याने आतड्यांवरही परिणाम होतो. तळलेल्या पदार्थांमध्ये चरबी आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे आतड्यांना नुकसान होऊ शकते. मुलांनाही हल्ली जास्त प्रमाणात वडापाव, भजी वा फ्राईज असे अनेक पदार्थ दिले जातात. पण या ऐवजी घरातील पदार्थांचे सेवन करणे अधिक योग्य ठरते. आतड्यांना हे तळलेले पदार्थ जास्तीत जास्त सडवतात आणि त्रासदायक ठरतात. त्यामुळे तुम्ही तळलेल्या पदार्थांचे सेवन नियमित करणे टाळावे हे तुमच्या आरोग्यासाठी अतिशय चांगले ठरते.
आतड्यांमध्ये जमलेली घाण काढून टाकतील ‘हे’ 4 पदार्थ, आताच आहारामध्ये करा समावेश
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.