आजकाल लोकांना नूडल्स आणि मोमोज खूप आवडतात. मोमोज आणि नूडल्स खायला खूप चविष्ट असतात पण ते आरोग्यासाठी खूप धोकादायक असतात. नूडल्स आणि मोमोज जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीराच्या अवयवांना नुकसान होऊ शकते. दोन्ही पदार्थ हे मैद्यापासून तयार होतात. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच नुडल्स आणि मोमो हे दोन्ही पदार्थ मनापासून आवडतात. पण याचे अधिक सेवन करणे हे पचनक्रियेसाठी मोठा अडथळा होते आणि याशिवाय गट हेल्थसाठीही त्रासदायक आणि धोकादायक ठरते. या दोन्ही पदार्थांपैकी सर्वात जास्त धोकादायक जंक फूड कोणते आहे जाणून घ्या (फोटो सौजन्य - iStock)
नूडल्स आणि मोमो हे असे पदार्थ आहेत की नुसतं नाव जरी घेतलं तरीही तोंडाला पाणी सुटतं. पण याचे सतत सेवन करणे हे पोटासाठी आणि पचनक्रियेसाठी त्रासदायक ठरू शकते. जाणून घ्या याचे दुष्परिणाम काय आहेत
मोमो हा एक अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे पण तो आरोग्यासाठी हानिकारक आहे. खरंतर मोमोजमध्ये कोबी, पनीर किंवा चिकनचे स्टफिंग असते. जर मोमोज व्यवस्थित वाफवले नाहीत तर त्यात आरोग्यासाठी धोकादायक असलेले टर्मीवर्म्स असू शकतात. बऱ्याचदा मोमोजमध्ये खराब भाज्या आणि चिकन स्टफिंग असते ज्यामुळे पोट खराब होऊ शकते
मोमो लाल चटणीसोबत खाल्ले जातात. मोमोज आणि चटणी जास्त काळ खाल्ल्याने छातीत जळजळ, छातीत दुखणे आणि हृदयाचे ठोके वाढणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. कारण मोमोजपासून बनवलेल्या चटणीमध्ये कार्बोहायड्रेट, कृत्रिम घटक, रसायने आणि रंग मिसळले जातात, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो
नूडल्स हा एक लोकप्रिय चिनी पदार्थ आहे आणि भारतात खूप लोकप्रिय आहे. नूडल्स खाल्ल्याने फुफ्फुसे, यकृत आणि मूत्रपिंडांचे नुकसान होते. खरंतर नूडल्समध्ये अजिनोमोटो टाकला जातो जो आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे
नूडल्स आणि मोमोज दोन्ही आरोग्यासाठी हानिकारक आहेत. दोन्हीपैकी कोणते जास्त हानिकारक आहे हे सांगणे थोडे कठीण आहे कारण ते तुम्ही कुठे नूडल्स खाता यावर देखील अवलंबून असते. ज्या तेल आणि साहित्याने नूडल्स आणि मोमोज बनवले जातात
दोन्ही पदार्थ मैद्यापासून तयार होतात त्यामुळे सतत याचे सेवन करणे हे पोटासाठी अत्यंत वाईट ठरू शकते. मैद्याचे सततचे सेवन केल्याने पचनक्रियेवर परिणाम होतो आणि त्याशिवाय गट हेल्थवरही वाईट परिणाम झाल्याचे दिसून येते