प्रोस्टेट ही एक ग्रंथी आहे जी पुरुषांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाची आहे. पण वयाच्या पन्नाशीनंतर त्याचा आकार वाढू लागतो. काही पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक असल्यामुळे 50 नंतर त्यांचे सेवन थांबवावे. पुरुषांनी वयाची पन्नाशी ओलांडली की, त्यांच्यामध्ये प्रोस्टेट वाढण्याचा धोका वाढू लागतो. पुर:स्थ ग्रंथी पुरुष प्रजनन प्रणालीचा एक भाग आहे, हे मूत्राशयाच्या खाली आणि गुदाशय समोर असते. शुक्राणूंसाठी आवश्यक द्रव तयार करणे हे त्याचे कार्य आहे. जे शुक्राणूंची वाहतूक करण्यास आणि निरोगी ठेवण्यास मदत करते. त्याभोवती एक नळी असते जी मूत्र बाहेर काढते. नक्की कोणते पदार्थ यासाठी टाळावे हे आपण डॉ. माधव भागवत यांच्याकडून जाणून घेऊया (फोटो सौजन्य - iStock)
पुरुषांमध्ये ५० वर्षांनंतर प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढू लागतो. सहसा हा कर्करोग नसतो परंतु कर्करोग होण्याची शक्यता असते. जेव्हा प्रोस्टेटचा आकार वाढतो तेव्हा ते मूत्राशय आणि मूत्र वाहून नेणाऱ्या नळीवर दबाव टाकतो. यामुळे, एकावेळी कमी लघवी जाण्याची किंवा लघवीचा प्रवाह कमकुवत होण्याची समस्या असू शकते
NHS च्या मते, प्रोस्टेट वाढल्याने लघवीतील बदलांशी संबंधित काही लक्षणे दिसू शकतात. हे पुरुषांमध्ये सौम्य ते गंभीर असू शकते. यामध्ये लघवी सुरू होण्यास त्रास होणे, वारंवार लघवी होणे, मूत्राशय रिकामे न होणे यासारख्या समस्यांचा समावेश असू शकतो
50 नंतर फुल फॅटयुक्त दुधाचे सेवन कमी करावे. जर्नल ऑफ न्यूट्रिशननुसार, फुल फॅट दुधाचे जास्त सेवन केल्यास प्रोस्टेटचा आकार वाढू शकतो. त्यामुळे प्रोस्टेट कर्करोगाचा धोकाही वाढू शकतो. असाच परिणाम इतर उच्च चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांवरदेखील होतो
लाल मांस आणि प्रक्रिया केलेले मांस प्रोस्टेटच्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकते. त्यात हेटरोसायक्लिक अमाइन (HCAs) असतात. जे प्रोस्टेट कर्करोगाचे कारण मानले जाते
मद्यपान केल्याने कर्करोगाचा धोका वाढतो. पण त्यामुळे प्रोस्टेटचा आकारही वाढू शकतो. त्यामुळे त्यापासून पूर्णपणे दूर राहावे. जर तुम्ही ते अचानक सोडू शकत नसाल तर त्याचे सेवन ताबडतोब कमी करा
सॅच्युरेटेड फॅटमुळे हृदयविकार होऊ शकतो. हे प्रोस्टेटचे नुकसानदेखील मानले जाते. सॅच्युरेटेड फॅट हे तेल, जंक फूड, बर्गर, प्रक्रिया केलेले पदार्थ इत्यादींमध्ये आढळते. त्यमाुळे सहसा पुरुषांनी वयाच्या 50 नंतर हे पदार्थ खाणे टाळावे