नारायणगाव (ता. जुन्नर) येथे नारायणगाव व वारूळवाडी गावच्या काठावर वसलेल्या मीना नदीच्या पात्रामध्ये अज्ञात इसमांनी सुमारे ५०० पेक्षा जास्त मृत कोंबड्या टाकल्या. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली असून येथे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. अनेक नागरिक आणि शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनी या परिसरातून ये जा करत असतात या विद्यार्थ्यांना तसेच येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.
पुणे/नारायणगाव : वारूळवाडी व नारायणगाव ग्रामपंचायतच्या वतीने पुलाच्या दोन्ही बाजूला सीसीटीव्ही बसवण्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र इथून जवळच असलेल्या पोलीस स्थानकाकडून व ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोंबड्या टाकणाऱ्या अज्ञात इसमावर कारवाई होणार का असा सवाल स्थानिक नागरिक करत आहे.
दरम्यान नारायणगाव ग्रामपंचायतीचा कार्यकाल पूर्ण झाल्याने ग्रामपंचायतवर सध्या प्रशासक नेमण्यात आले आहेत.
जेव्हापासून प्रशासक नेमण्यात आले आहे तेव्हापासून नारायणगाव ग्रामपंचायतच्या वतीने सुरू असलेली कामे काहीशी ठप्प झाली असून पिण्याच्या पाण्याचे नियोजन, कचऱ्याचे नियोजन विस्कळीत झाले असल्याची तक्रार अनेक नागरिकांनी केली आहे. मृत कोंबड्या नदीपात्रात टाकणाऱ्या संबंधितावर नारायणगाव ग्रामपंचायत व पोलीस कारवाई करणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
चौकट :
दरम्यान नारायणगावचे माजी सरपंच योगेश पाटे, माजी उपसरपंच आरिफ आतार व काही माजी सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तसेच ग्रामपंचायत ची कचरा गाडी बोलवून नदीपात्रात टाकलेल्या मृत कोंबड्यांची विल्हेवाट लावली.
Web Title: %e0%a4%a4 incident in narayangaon junnar threat to citizens health due to throwing dead chickens in the riverbed