Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणेशोत्सवात १८०० ‘सीसीटीव्ही’ कॅमऱ्यांची पुण्यावर नजर; पोलिसांनी मंडळांना दिल्या ‘या’ सूचना

वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवात राज्य, तसेच देशाच्या वेगवेगळ्या भागांतून भाविक येतात. उत्सवी गर्दीवर शहरातील १८०० सीसीटीव्ही कॅमेरे नजर ठेवणार आहेत. पोलिसांनी मंडळांच्या कार्यकर्त्यांना मंडपाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 14, 2023 | 06:32 AM
गणेशोत्सवात १८०० ‘सीसीटीव्ही’ कॅमऱ्यांची पुण्यावर नजर; पोलिसांनी मंडळांना दिल्या ‘या’ सूचना
Follow Us
Follow Us:

पुणे : वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवात राज्य, तसेच देशाच्या वेगवेगळ्या भागांतून भाविक येतात. उत्सवी गर्दीवर शहरातील १८०० सीसीटीव्ही कॅमेरे नजर ठेवणार आहेत. पोलिसांनी मंडळांच्या कार्यकर्त्यांना मंडपाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

उत्सवाच्या काळातील अनुचित घटना, दागिने, मोबाइल चोरीच्या घटना रोखणे तसेच संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. उत्सवाच्या काळात शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचारी, गुन्हे शाखेची पथके, महिलांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेले दामिनी पथक, साध्या वेशातील पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक शहराच्या वेगवेगळ्या भागात गस्त घालणार आहेत. पुणे पोलिसांनी बसवलेले एक हजार ३०० कॅमेरे, स्मार्ट सिटी योजना, महापालिकेच्या ५०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर उत्सवी गर्दीवर राहणार आहे.

शहरात अडीच हजारहून जास्त नोंदणीकृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. पोलिसांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे. मंडळांनी उत्सवाच्या कालावधीत मंडपाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. मंडपाच्या परिसरातील रस्त्यांवर कॅमेरे बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मध्यभागात नजर

शिवाजी रस्ता परिसरातील बुधवार चौक ते मंडईतील गोटीराम भैय्या चौक दरम्यान उत्सवाच्या कालावधीत भाविकांची मोठी गर्दी असते. मंडई, हुतात्मा बाबू गेनू चाैक परिसरात भाविकांची मोठी गर्दी होती. शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, लक्ष्मी रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना भागात होणारी गर्दी विचारात घेऊन पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून गर्दीचे नियंत्रण करणे शक्य होईल. बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांनी याबाबतच्या सूचना देण्यात येतील.

सदाशिव पेठ, नारायण पेठ, शुक्रवार पेठ भागातील अंतर्गत भागातील दुकानदार, व्यावसायिकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पोलीस आयुक्तालय, उपायुक्त कार्यालय जोडणी करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तालयातील मुख्य नियंत्रण कक्षातून उत्सवी गर्दीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे.

घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त

देशभरात घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना पुणे पोलिसांनी कोथरुड परिसरातून अटक केली. संभाव्य दहशतवादी हल्ला, घातपाती कारवाया विचारात घेऊन पोलिसांकडून उत्सवाच्या काळात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

[blockquote content=”गणेशोत्सवात हजारो भाविक पुणे शहरात येतात. भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून, उत्सवातील गर्दीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. सार्वजनिक मंडळे, स्थानिक व्यापारी, व्यावसायिकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.” pic=”” name=” – रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे”]

Web Title: 1800 cctv cameras eye on pune during ganeshotsav the police gave these instructions to the circles nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2023 | 06:32 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • ganesh utsav
  • maharashtra
  • NAVARASHTRA
  • Pune

संबंधित बातम्या

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला
1

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला

बुलेट ट्रेनचा वेग वाढणार, देखभालीचीही जय्यत तयारी; 3 शहरांत उभारले जाणार अत्याधुनिक डेपो
2

बुलेट ट्रेनचा वेग वाढणार, देखभालीचीही जय्यत तयारी; 3 शहरांत उभारले जाणार अत्याधुनिक डेपो

Raigad News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज उलटा फडकवला; ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
3

Raigad News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज उलटा फडकवला; ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी

अरुणाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार; फ्लॅश फ्लडमध्ये ५ जवान बेपत्ता, भूस्खलनात चौघांचा मृत्यू
4

अरुणाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार; फ्लॅश फ्लडमध्ये ५ जवान बेपत्ता, भूस्खलनात चौघांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.