Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्रापुरात पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस, दोनच दिवसात 21 जणांना चावा; अखेर ग्रामस्थांनी…

शिक्रापूर (ता. शिरुर) येथे शनिवार व रविवार या दोन दिवसात तब्बल २१ जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याचा प्रकार घडला आहे. या कुत्र्याला मारल्याचे निष्पन्न झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 23, 2025 | 03:50 PM
शिक्रापुरात पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस, दोनच दिवसात 21 जणांना चावा; अखेर ग्रामस्थांनी...

शिक्रापुरात पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस, दोनच दिवसात 21 जणांना चावा; अखेर ग्रामस्थांनी...

Follow Us
Follow Us:

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरुर) येथे शनिवार व रविवार या दोन दिवसात तब्बल २१ जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याचा प्रकार घडला आहे. या उच्छादाने त्रासलेल्या ग्रामस्थांनी अखेर या कुत्र्याला मारल्याचे निष्पन्न झाले असून, २१ पैकी १२ जणांनी श्वानदंश प्रतिबंधक लस घेतल्याची माहिती सरपंच रमेश गडदे यांनी दिली.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथे शनिवार व रविवार या दोन दिवसात महाबळेश्वरनगर, इको ग्राम सोसायटी व तळेगाव रोड परिसरात दोन पिसाळलेली कुत्रे फिरत असून, ती नागरीकांवर हल्ला करीत असल्याची बाब निष्पन्न झाली. सुरवातीला ही केवळ चर्चा होती मात्र आज रविवारी सकाळी सुमारे २१ जणांना सदर पिसाळलेले कुत्रे चावल्याचे आज निष्पन्न झाले. यातील १२ जनांनी शिक्रापूर ग्रामिण रुग्णालयात उपचार घेतल्याची माहितीही शिक्रापूर ग्रामपंचायतीकडे उपलब्ध झाली असून, सदर कुत्र्याच्या शोधार्थ सकाळपासूनच पेट पोर्स संस्थेचे कार्यकर्ते व ग्रामपंचायत कर्मचारी संपूर्ण गावात फिरत होते. मात्र इकोग्राम सोसायटी परिसरातील काही नागरीकांनी यातील एक पिसाळलेले कुत्रे मारल्याचे निष्पन्न झाले आहे.

दूसरे पिसाळलेले कुत्रे आहे की नाही याबाबत अद्यापही संभ्रम असून, त्याचा शोध सुरु आहे. दरम्यान गावात अ‍ॅंटीरॅबीज लसीकरण यापूर्वी मोठ्या प्रमाणात केले असून, तरीही अशी कुत्री सापडणे आमच्यासाठी आव्हान असून ग्रामस्थांनी संशयास्पद वावरणाऱ्या कुत्र्यांची माहिती तातडीने ग्रामपंचायतीला कळविण्याचे आवाहन सरपंच रमेश गडदे यांनी केले. शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय येथे आज सकाळपासून श्वान दंश झालेले अनेक रुग्ण आल्यानंतर त्यांना लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शहाजी कदम यांनी दिली.

हे सुद्धा वाचा : हाँकाँगमधून कागद मागवून बनावट नोटाची छपाई; कोल्हापुरातील दोघांना अटक

पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल ६६ जणांचा घेतला चावा

गेल्या काही महिन्याखाली आळंदी नगरपरिषदेच्या हद्दीत भागीरथी नाल्यावर पिसाळलेल्या कुत्र्याने दोन दिवसांत तब्बल ६६ नागरिकांना चावा घेतला आहे. आळंदीतील भागीरथी नाल्यावरून ये-जा करीत असताना रविवारी (१५ डिसेंबर) २० जणांना, सोमवारी ( १६ डिसेंबर ) दुपारी दोन पर्यंत ४४ जणांना तर दुपारी दोन नंतर आणखी दोन जणांना कुत्र्याने चावा घेतला. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर पिंपरी – चिंचवड महापालिका पशु वैद्यकीय विभागाच्या लोखंडी पिंजऱ्यात कुत्र्यास जेरबंद करून पुढील उपचारास सुपूर्द करण्यात आले. दरम्यान, घडलेल्या घटनेमुळे आळंदीतील नागरिकांमध्ये मोठी नाराजी पसरलेली आहे.

Web Title: 21 people have been bitten by a stray dog in shikrapur nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2025 | 03:50 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • Dog
  • maharashtra
  • pune news
  • Shikrapur
  • Shikrapur News

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
1

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन
2

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक
3

Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक

Mira Bhayandar News: मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा भंग भोवला; अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी, सचिन बांगर यांची नियुक्ती
4

Mira Bhayandar News: मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा भंग भोवला; अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी, सचिन बांगर यांची नियुक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.