ठाणे : अग्निवीरच्या (Agneeveer) भरतीसाठी आलेल्या एका युवकाचा रेल्वेच़्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना मुंब्रा रेल्वे स्थानकावर उघडकीस आली आहे. रामेश्वर देवरे (वय22) असं या युवकाचं नाव आहे. तो अग्निवीरच्या भरतीसाठी धुळे जिल्हयातून आला होता.
[read_also content=”या’ दिवशी उलगडणार शकुंतला आणि दुष्यंतची प्रेमकथा, ‘शाकुंतलम’ चित्रपटाची रिलीज डेट आली समोर https://www.navarashtra.com/movies/the-love-story-of-shakuntala-and-dushyanta-will-be-revealed-on-this-day-nrps-328922.html”]
बुधवारी सकाळच्या सुमारास मुंब्रा रेल्वेस्थानकावर हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रामेश्वर देवरे 20 वर्षीय तरुण धुळे जिल्ह्यातील वडजाई या गावाहून अग्निवीरच्या भरतीसाठी मुंब्र्याला आला होता. त्याच्यासोबत त्याच्या गावातील काही मित्रही होते. रामेश्वर मुंब्रा रेल्वे स्थानकावर आला असता त्याला मळमळ होऊ लागलं. तो उलटी करण्यासाठी रेल्वे रुळाकडे गेला. तो फलाटावरुन वाकून उलटी करत असताना अचानक भरधाव लोकल ट्रेन आली. या लोकलमुळे रामेश्वरच्या डोक्याला जोराची धडक बसली. तो 10 ते 15 फूट दूर फेकला गेला. गंभीर रित्या जखमी झाल्यामुळे रामेश्वरचा मृत्यू झाला. ही घटना ही मुंब्रा रेल्वे स्थानकावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत असून अशाप्रकारे एका तरुणाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
[read_also content=”‘दार उघड बये’ मालिकेचं शीर्षकगीत गायला मिळाल्याचा वेगळाच आनंद – अनुजा देवरे https://www.navarashtra.com/movies/anuja-devre-interview-about-dar-ughad-baye-title-sng-nrsr-328928.html”]