सातारा: ९९ व्या मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. काळा बुक्का त्यांच्या अंगावर आणि चेहऱ्यावर फेकत हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची कोषाध्यक्ष आणि साताऱ्यात भरलेला 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजन समितीचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर संमेलन स्थळावर प्रकाशन कट्टा दालनाच्या परिसरात एकाने हल्ला चढवत संमेलन घेतोच कसे ?असे म्हणत हल्ला चढवला .प्रज्ञा सूर्य सामाजिक संस्थेचा सदस्य संदीप जाधव याला शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
BJP master plan for west Bengal: ममता बॅनर्जींच्या सत्तेला सुरूंग लावण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन
जाधव याने विनोद कुलकर्णी यांच्या चेहऱ्यावर काळे फेकण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्या डोळ्याला जळजळ होऊ लागली .संमेलनाच्या दालनांमध्येच असा खळबळ जनक प्रकार घडल्याने सारेच सारस्वत आणि रसिक श्रोते अवाक झाले .गेल्या दोन दिवसापासून अत्यंत उत्साहामध्ये साहित्य संमेलन सुरू आहे .शनिवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी प्रकाशन कट्ट्यावरचा कार्यक्रम आटोपून व्यासपीठावरून खाली येत असताना त्यावेळी प्रज्ञा सूर्य सामाजिक संस्थेचा अध्यक्ष संदीप जाधव व 42 राहणार तांदुळवाडी तालुका कोरेगाव यांनी तेथे येऊन कुलकर्णी यांच्यावर अचानक हल्ला चढवला पोलिसांकडे दाखल झालेल्या खबरीजबाबानुसार त्याने त्याच्या जवळील काळ्या रंगाची पावडर विनोद कुलकर्णी यांच्या तोंडावर टाकली .त्या पावडरमुळे विनोद कुलकर्णी यांच्या डोळ्याला जळजळ होऊ लागली .तू संमेलन घेतोच कसे अशी दमदाटीची भाषा वापरत जीवे मारण्याची धमकी दिली.
Ladki Bahin Yojana : धक्कादायक! ‘लाडक्या बहिणीं’चे संकेतस्थळ बंद, ग्रामीण भागात अडचणी
शाहूपुरी पोलिसांनी तात्काळ जाधव याला ताब्यात घेत त्याची पोलीस स्टेशनला रवानगी केली .जाधव याने संमेलन स्थळावर जय जवान जय किसान म्हणत तिथेच राष्ट्रगीत गायला प्रारंभ केला .अचानक झालेल्या या प्रकारामुळे संमेलन स्थळावरील सर्व निमंत्रित सारस्वत आणि रसिक स्रोते आवाक झाले .या प्रकाराचा सर्व साहित्यप्रेमींनी निषेध केला असून साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा असले प्रकार खपवून घेणार नाही असा इशारा दिला आहे .कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी सर्व साहित्यिक महामंडळाचे पदाधिकारी श्रोते यांना शांत राहण्याचे आवाहन केले असून यापुढेही साहित्य सेवा माझी अशी अखंडपणे सुरू राहील अशी ग्वाही दिली आहे .






