काय घडलं नेमकं?
मृत महिलेचं नाव आशा संतोष किरंगा (२४) असे आहे. ती नऊ महिन्यांची गर्भवती होती. आलदंछी हे तालुका मुख्यालयापासून सहा किलोमीटर अंतरावर आहे. अशा हिला प्रसववेदना जाणवताच तातडीने दवाखान्यात जात यावे यासाठी १ जानेवारीला आशा आपल्या पती संतोष सोबत आलदंडी टोला येथून जंगलातील मार्गाने सहा किलोमीटर पायपीट करत तोडसाजवळील पेठा गावात आपल्या बहिणीच्या घरी राहण्यासाठी गेली. मात्र, दिवसभर अवजडलेल्या स्थितीत चालल्याने २ जानेवारीला रोजी पहाटे २ वाजता तिला प्रसववेदना जाणवण्यास सुरुवात झाली. पेठा गावातील आशा सेविकेने हेडरी येथील लॉयडस् काली अम्माल हॉस्पिटलशी संपर्क करुन रुग्णवाहिका पाचारण केली. रुग्णवाहिकेतून तातडीने दवाखान्यात भरती केले.
डॉक्टरांनी सिझेरियनचा निर्णय घेतला. मात्र बाळ पोटातच दगावल्याची डॉक्टरांना आढळले. त्यानंतर आशा किरंगा यांचा रक्तदाब वाढला आणि आशाचा मृत्यू झाला. शवविच्छेदनासाठी बाळ व मातेचे शव हेडरी येथून एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र, तेथे स्त्रीरोगतज्ज्ञ उपलब्ध नसल्याने पुढे ४० किलोमीटरवरील अहेरीला पाठवावे लागले. अहेरी येथील ग्रामीण रुग्णालयात २ जानेवारी रोजी दुपारी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांकडे स्वाधीन केले. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आरोग्य सुविधांचा मुद्दा ऐरणीवर
या घटनेने पुन्हा दुर्गम भागातील आरोग्य सुविधांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. संबंधित गर्भवतीच्या आशासेविकांमार्फत गृहभेटी घेतल्याची नोंद आहे. ती पायी चालल्यामुळे तिला अचानक प्रसववेदना झाल्या, डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण यश आले नाही. या घटनेचा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत अहवाल मागवला आहे.
Ans: गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील आलदंछी परिसरात.
Ans: गावात प्रसूती सुविधा नसणे व दीर्घ पायी प्रवासामुळे झालेल्या गुंतागुंती.
Ans: दुर्गम भागातील अपुरी आरोग्य व्यवस्था आणि माता–बाल आरोग्याचा गंभीर प्रश्न.






