गोंदिया : धान खरेदीची मर्यादा वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळे आता खरेखुरे शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र ७ जुलै रोजी एका तासात तब्बल ४.५० लाख क्विंटल धानाची (4.50 lakh quintals of grain in one hour) गोंदिया जिल्ह्यात खरेदी (Shopping in Gondia district ) झाल्याने हे धान व्यापाऱ्यांचे असल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे पत्र आमदार विनोद अग्रवाल (MLA Vinod Agarwal) यांनी जिल्हाधिकारी (Collector), मुख्यमंत्री (Chief Minister) आणि उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) यांना दिले आहे.
राज्यात नवीन सरकाराचे गठन झाल्यानंतरच विदर्भातील ६ आमदाराद्वारे रब्बी धानाकरीता धान खरेदी केंद्र सुरु करणेबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांना निवेदन दिले होते. त्यानंतर काही दिवसांतच रब्बी धान खरेदीकरीता आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. ७ जुलै रोजी झालेल्या धान खरेदी मध्ये शेतक-यांकडून धान न घेता व्यापारांचे धान खरेदी करण्यात आलेली आहे. तसेच एका तासामध्येच ४.५० लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आले आहे. शेतकऱ्यांकडे असलेले धान खरेदी न केल्याने ही बाब शेतकऱ्यांवर अन्यायजनक आहे. पावसाळ्याच्या दिवसांची सुरुवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी रोवणी सुरु केली आहे. आधारभूत शासकीय धान खरेदी मध्ये शेतकऱ्यांचे धान खरेदी न केल्याने त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावे लागत आहे.
जर आधारभूत धान खरेदीत शेतकऱ्यांचे धान खरेदी केले असते तर त्यांना आर्थिक संकटाचा समोर जावे लागले नसते. तसेच एका दिवसात जेवढे धान खरेदी करता येते त्यापेक्षा जास्त धानाची खरेदी एका दिवसात झाली आहे, ही बाबही विचारात घेण्यासारखी आहे. त्यामुळे ही बाब गाभीर्याने घेत आमदार विनोद अग्रवाल यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ज्या आधारभूत धान खरेदीमध्ये शेतक-यांकडून धान न घेता व्यापारांचे धान खरेदी केले आहे. त्यांची योग्य चौकशी करून योग्य कार्यवाही करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांना धान खरेदी केंद्रावर तसेच संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.