File Photo : job Vacancy
मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यातील अंगणवाडी मदतनीस अर्थात हेल्परच्या 44 जागांसाठी तब्बल 220 अर्ज प्राप्त झाले आहेत. या हेल्परची अंतिम निवड यादी वेळापत्रकाप्रमाणे लावण्यात येईल, अशी माहिती बालविकास प्रकल्पाधिकारी जगन्नाथ गारुळे यांनी दिली. सन 2024 मधील अंगणवाडी मदतनीस पदाच्या 44 जागांसाठी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाकडून नुकतीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या पदासाठी तालुक्यातून तब्बल 220 अर्ज प्राप्त झाले आहेत.
गावनिहाय अर्जाची संख्या पुढीलप्रमाणे :
कचरेवाडी – 11, लेंडवे चिंचाळे-6, गणेशवाडी -2, मल्लेवाडी -3, घरनिकी-5, तांडोर-3,अरळी-6, डोणज-13, बोराळे-7, मुंढेवाडी -6, सिध्दापूर-6, माचणूर-6, धर्मगांव -3, मुढवी-3, उचेठाण-6, संत चोखामेळा नगर-7, शिरनांदगी-7, मानेवाडी-3, लोणार-3, पडोळकरवाडी-3, नंदेश्वर-9, खडकी-7, जुनोनी-7, गोणेवाडी-6.
यासह शिरशी-3, चिकलगी-4, रड्डे -19, जालिहाळ-5, मरवडे -9, येड्राव-4, जित्ती -1, निंबोणी-9, भाळवणी -3, आसबेवाडी -2, सोड्डी-7, जंगलगी 4, हुलजंती -4, मारोळी 8 असे एकूण 220 मदतनीससाठी अर्ज कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत. सर्वाधिक अर्ज रड्डे अंगणवाडीसाठी, व्दितीय क्रमांकावर डोणज, तृतीय क्रमांकावर कचरेवाडी तर सर्वात कमी जित्ती येथे असे अनुक्रमे अर्ज प्राप्त झाले आहेत.
दरम्यान, जागांची संख्या व आलेल्या अर्जाची संख्या पाहता जवळपास चौपट अर्ज प्राप्त झाल्याने सुशिक्षित बेरोजगार तरूणींची संख्या मोठी असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. वेळापत्रकाप्रमाणे ठरलेल्या दिवशी अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. प्राथमिक गुणवत्ता निवड यादी ही गुणवत्तेवर आधारीत असल्याने ही यादी पारदर्शी प्रसिध्द होणार आहे.