भाजपचा हुकुमाचा इक्का...!उमेदवारी जाहीर होताच तावडेंची पहिली प्रतिक्रीया
विनोद तावडे यांना पुन्हा एकदा राज्यसभेवर संधी मिळाल्यानंतर विनोद तावडे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. “अनंत आभार आणि धन्यवाद! पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने राज्यसभेचा उमेदवार म्हणून निवड केल्याबद्दल वरिष्ठ नेतृत्वाचे मनापासून आभार! माननीय पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या नेतृत्वाखाली, आम्ही नेहमीच देशहिताची सेवा करण्यास वचनबद्ध आहोत. या नामांकनाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणयांचे मनापासून आभार! ही नवीन जबाबदारी पूर्ण समर्पण आणि निष्ठेने पार पाडण्यासाठी मी दृढ आणि वचनबद्ध आहे.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे संघटनात्मक कौशल्य आणि पक्षनिष्ठा हे राज्यसभेची उमेदवारी जाहीर होण्यामागचे खरे कारण मानले जात आहेत. विशेषत: बिहार आणि इतर राज्यांमधील निवडणुकांच्या काळात त्यांची कामगिरी या निर्णयामागे निर्णायक ठरली आहे.
दरम्यान, २०२२ मध्ये नितीश कुमार यांनी NDAची साथ सोडल्यानंतर भाजपने विनोद तावडे यांच्यावर बिहारच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली. बिहारसारख्या राज्यात तावडेंनी बूथ स्तरापर्यंत भाजपची संघटना मजबूत करत तेथील कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह भरला. तावडेनी बूथ स्तरापर्यंत भाजपची संघटना मजबूत करण्याचे काम केले. २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत विनोद तावडेंच्या सुक्ष्म नियोजनामुळेच भाजप आणि एनडीएला घववीत यश मिळाले.
महाराष्ट्राच्या राजकारणातील अभ्यासू आणि आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जाणारे विनोद तावडे आता राज्यसभेच्या माध्यमातून संसदेत प्रवेश करत आहेत. अष्टपैलू नेतृत्व आणि संघटनात्मक कौशल्याच्या जोरावर त्यांनी मुंबई ते दिल्ली असा थक्क करणारा प्रवास केला आहे.
US-Israel Iran War : केरळात भाजपवर दबाव; लाखो केरळी लोक रोजगारासाठी आखाती देशांत
राज्यातील आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने विनोद तावडे यांना महाराष्ट्रातून उमेदवारी दिली आहे. विनोद तावडे यांच्यासह रामदास आठवले, माया इवनाते आणि रामराव वडकुते यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यातील विधानसभेच्या संख्याबळानुसार निवडणुकीपूर्वीच तावडेंचा विजय निश्चित मानला जात आहे. या माध्यमातून ते पहिल्यांदाच संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य म्हणून प्रवेश करतील.






