पोटाचा घेर होईल कमी! महिनाभर नियमित करा मध लिंबाच्या पाण्याचे सेवन
दैनंदिन आहारात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आहारात कायमच सात्विक आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करतात. कधी वेगवेगळ्या ड्रिंकचे सेवन केले जाते तर कधी सप्लिमेंटचे सेवन केले जाते. याशिवाय काही लोक तासनतास जिममध्ये जाऊन व्यायाम करतात. पण सतत व्यायाम केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. चुकीचा डाएट फॉलो केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. मांड्यांवर आणि पोटावर वाढलेल्या चरबीमुळे काहीवेळा महिलांचा आत्मविश्वास कमी होऊन जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी मध लिंबाच्या पाण्याचे कधी सेवन करावे? या पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी मधाच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. मधामध्ये अॅंटी-ऑक्सीडेंट्स, अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात. सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध मिक्स करून प्यायल्यास पोटावर जमा झालेला चरबीचा घेर कमी होईल आणि तुम्ही स्लिम व्हाल. मधाचे सेवन केल्यामुळे शरीराचे मेटाबॉलिज्म बूस्ट होण्यास मदत होते. मेटाबॉलिज्म बूस्ट झाल्यामुळे शरीराच्या कॅलरीज बर्न होतात, ज्यामुळे वाढलेले वजन सहज कमी होण्यास मदत होते.
मधामध्ये असलेला नैसर्गिक घटक आणि नैसर्गिक गोडवा शरीरासाठी अतिशय प्रभावी ठरतो. मधाचे सेवन केल्यामुळे इंस्टन्ट एनर्जी मिळते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात मध मिक्स करून प्यायल्यास शरीरात दिवसभर ऊर्जा टिकून राहील. याशिवाय या पाण्याच्या सेवनामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी मधाच्या पाण्याचे सेवन करावे.
लिंबाच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. वाढलेले वजन कमी करण्यासाठी कायमच लिंबाचे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये असलेले विटामिन सी आणि इतर आवश्यक घटक शरीराला फायदेशीर ठरतात. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी कोमट पाण्यात लिंबाचा मिक्स करून प्यायल्यास शरीर स्वच्छ होईल. लिंबाच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे भूक नियंत्रणात राहते. डिहायड्रेशन झाल्यानंतर लिंबू पाण्याचे सेवन करावे. लिंबू पाण्याच्या सेवनामुळे शरीर हायड्रेट राहते.
मधाच्या पाण्याचे फायदे:
दिवसभर शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करते. बद्धकोष्ठता, गॅस आणि पोटफुगीसारख्या समस्या कमी होतात. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी निरोगी पेयांपैकी हे एक आहे.
मधाच्या पाण्याचे तोटे:
अती प्रमाणात मध खाल्ल्यास त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. विशिष्ट आजार असलेल्या लोकांसाठी हे हानिकारक असू शकते.