जात वैधतेसाठी यवतमाळमध्ये उसळली मोठी गर्दी! आत्तापर्यंत दोनशे अर्ज आणि पोचपावतीसाठी मोठी धडपड
यवतमाळ: नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांसोबतच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाही लवकरच येणार आहेत. या निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्रांची आवश्यकता आहे. त्यामुळे इच्छूक उमेदवार जात वैधता प्रमाणपत्र कार्यालयात गर्दी करीत आहेत. याठिकाणी जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी दिवसभर भावी उमेदवारांच्या रांगा पाहायला मिळत आहेत.उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांना आपल्या प्रवर्गातून अर्ज दाखल करायचे असतात. हे अर्ज दाखल करताना जात वैधता प्रमाणपत्र गरजेचे आहे. हे प्रमाणपत्र काढण्यासाठी मोठा विलंब लागतो. यामुळे ज्या उमेदवाराकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही ते उमेदवार नामांकन भरण्यापूर्वी जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र कार्यालयाकडे अर्ज करत आहेत.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
Thane News : उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात प्रशासनाची धडक कारवाई; औषधांच्या पाकिटात आढळून आली दारू!
हा अर्ज दाखल करताच उमेदवारांना त्याची पोचपावती दिली जाते. या पावतीच्या आधारे संबंधित प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज दाखल करता येतो. मात्र, निवडून आल्यानंतर सहा महिन्यांत ज्या प्रवर्गातून अर्ज दाखल केला त्या प्रवर्गाचे प्रमाणपत्र निवडणूक विभागाला सादर करण्याची यातून मुभा असते. याच संधीचा लाभमिळविण्यासाठी भावी उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र कार्यालयात गर्दी केली आहे. या कार्यालयाकडे आतापर्यंत २०० अर्ज दाखल झाले. पुढील ५ दिवसांत अर्ज आणखी वाढण्याचा अंदाज आहे.
सुटीच्या दिवशीही स्वीकारणार अर्ज राखीव जागांसाठी निवडणूक लढविण्यास इच्छूक उमेदवारांकडून जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज स्वीकृतीसाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहे. १५ व १६ नोव्हेंबर या दोन्हीसुटीच्या दिवशीही कार्यालय अर्ज स्वीकृतीच्या दृष्टीने नियमितपणे सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्यास इच्छूक उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी अतिरिक्त सोय होणार आहे. यासंदर्भात समितीचे अध्यक्ष तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी सोन्नाप्पा यमगर, उपायुक्त तथा सदस्य प्राजक्ता इंगळे, तसेच संशोधन अधिकारी ज्योत्सना तिजारे यांनी उमेदवारांना वेळेवर अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले आहे.
मनमानी कर आकारणीने नागरिक संतप्त, दारव्हानगर पालिकेच्या कारभारावर रोष; नोटीसची केली होळी
आतापर्यंत भरलेले उमेदवारी अर्ज दरम्यान, जिल्ह्यात अजूनही नामांकन अर्ज भरण्याबाबत उमेदवारांकडून घाई होताना दिसत नाही. गुरूवारी पांढरकवड्यात नगराध्यक्षपदासाठी १ अर्ज आला. तसेच सदस्यपदासाठीही १ अर्ज आला. त्यासोबतच उमरखेड, नेरमध्ये नगरसेवकासाठी प्रत्येकी ४ अर्ज आलेत. सर्वांचे लक्ष असलेल्या यवतमाळ नगरपालिकेतही सदस्यपदासाठी गुरुवारी ६ नामांकन अर्ज दाखल झाले. जिल्ह्यात नगराध्यक्षपदासाठी आतापर्यंत पांढरकवड्यात २, दिग्रसमध्ये १ असे दोनच अर्ज दाखल झालेत. तर नगरसेवकासाठी आतापर्यंत दिग्रसमध्ये ३. पांढरकवड्यात १. घाटंजीत १, नेरमध्ये ४, उमरखेडमध्ये ४ एवढेच नामांकन भरले गेले आहेत.






