Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नाचे निमित्ताने चिमुकल्याला घेऊन कुटूंब फरार; पुण्यातील धक्कादायक प्रकार

शेजारी राहणाऱ्या दाम्पत्याने मावशीच्या मुलीचे लग्न आहे. तुमच्या मुलाला आम्ही गावाला घेऊन जातो म्हणून नेत मुलाला घेऊन पोबारा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 18, 2023 | 07:31 AM
लग्नाचे निमित्ताने चिमुकल्याला घेऊन कुटूंब फरार; पुण्यातील धक्कादायक प्रकार
Follow Us
Follow Us:

पुणे : शेजारी राहणाऱ्या दाम्पत्याने मावशीच्या मुलीचे लग्न आहे. तुमच्या मुलाला आम्ही गावाला घेऊन जातो म्हणून नेत मुलाला घेऊन पोबारा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे दाम्पत्य ६ वर्षाच्या चिमुरड्याला घेऊन गेले असून, त्यांचा शोध आता पोलिसांकडून घेतला जात आहे. याप्रकाराने मुलाच्या कुटूंबियाचा जिव टांगणीला लागला आहे.

अंजली प्रमोद शुक्ला (वय २१) आणि नितीन प्रमोद शुक्ला (वय १९, दोघेही रा. उत्तरप्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २७ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत एका ३८ वर्षीय महिलेनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कुटूंब मुंबईचे आहे. ते येरवड्यातील नातेवाईकांकडे सहा वर्षाच्या मुलाला घेऊन आले होते. नातेवाईकांच्या शेजारी एक उत्तरप्रदेशातील कुटुंब होते. एकमेकांचे शेजारी असल्याने त्यांच्यात सलोख्याचे वातावरण होते. त्याचाच फायदा घेत अंजली आणि प्रमोद यांनी तक्रारदार यांच्या ६ वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलीचे लग्न आहे, चिमुकल्याला घेऊन जाऊ का ? अशी विचारणा केली. त्यावर तक्रारदारांनी त्यांना होकार दिला. मुलाला त्यांच्याबरोबर आठवडा भरापूर्वी स्वखुशीने पाठवले.

उत्तर प्रदेशात पोहचल्याबाबत त्यांचा फोनही आला. मात्र अचानक प्रमोद व अंजलीचा फोन वारंवार स्विचऑफ येत असल्याने कुटुंबियांची धाकधुक वाढली. सरते शेवटी त्यांनी येरवडा पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. येरवडा पोलीस उत्तर प्रदेश पोलिसांच्या संपर्कात आहेत. तेथील स्थानिक पोलिसही मुलाचा शोध घेत असून येरवडा पोलिसांकडून सर्व बाजुंनी मुलाशी व त्या दोघांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Web Title: A family absconding with a child on the occasion of a wedding shocking types in pune nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2023 | 07:31 AM

Topics:  

  • Chief Minister Yogi Adityanath
  • cmomaharashtra
  • maharashtra
  • Pune

संबंधित बातम्या

Madha Jamgaon Murder Case : २ लाख ४० हजारांच्या दागिन्यांसाठी वृद्धाचा घेतला बळी!
1

Madha Jamgaon Murder Case : २ लाख ४० हजारांच्या दागिन्यांसाठी वृद्धाचा घेतला बळी!

Solapur News: गोकुळला तहसीलदारांचा दणका! अडीच कोटी थकीत; एफआरपी तत्काळ देण्याचे निर्देश
2

Solapur News: गोकुळला तहसीलदारांचा दणका! अडीच कोटी थकीत; एफआरपी तत्काळ देण्याचे निर्देश

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
3

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.