Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gondiya: गोंदियात पावसामुळे तीन तालुक्यात अतिवृष्टी; भातशेतीला दिलासा- शेतकरी समाधानी

गोंदियात सलग तीन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे देवरी, अर्जुनी-मोरगाव व सडक-अर्जुनी तालुक्यांत अतिवृष्टी झाली असून जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ९७% पाऊस झाला आहे. यामुळे करपणाऱ्या धान पिकांना नवसंजीवनी मिळून दुबार पेरणीचे संकट टळले आहे आणि रोवणीच्या कामांना वेग आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 23, 2026 | 02:51 PM
Gondiya: गोंदियात पावसामुळे तीन तालुक्यात अतिवृष्टी; भातशेतीला दिलासा- शेतकरी समाधानी
Follow Us
Follow Us:
  • तीन तालुक्यांत अतिवृष्टी: मागील ३ दिवसांच्या संततधार पावसामुळे देवरी, अर्जुनी-मोरगाव आणि सडक-अर्जुनी तालुक्यांत अतिवृष्टी झाली असून जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ९७% पाऊस झाला आहे.
  • दुबार पेरणीचे संकट टळले: पावसाअभावी करपणाऱ्या धानाच्या रोपवाटिकांना नवसंजीवनी मिळाली असून दुबार पेरणीची भीती आता पूर्णपणे दूर झाली आहे.
  • भाताच्या रोवणीला वेग: उकाड्यापासून दिलासा मिळण्यासोबतच रखडलेल्या भात रोवणीच्या कामांना आता वेग येणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. बुधवारी देवरी, अर्जुनी-मोरगाव आणि सडक-अर्जुनी या तीन तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. देवरीमध्ये ७४.०२ मिमी, अर्जुनी-मोरगावमध्ये ८७.०८ मिमी, तर सडक-अर्जुनीमध्ये ७६.०५ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत ४७४ मिमी, म्हणजेच वार्षिक सरासरीच्या ९७.०३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. ८ जुलैनंतर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे वातावरणात उकाडा वाढला होता.

पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाताय? ‘या’ भाज्या ठरू शकतात आरोग्यासाठी सर्वात धोकादायक, जाणून घ्या कारण

तालुक्यातील पावसाची नोंद 

रोपवाटिका करपण्याच्या मार्गावर आल्या होत्या पावसाअभावी धानाच्या आणि शेतकऱ्यांमध्ये दुबार पेरणीची भीती निर्माण झाली होती. मात्र. वरुणराजाने पुन्हा दमदार हजेरी लावत सलग तीन दिवस संततधार सुरू ठेवल्याने खरीप हंगामाला नवसंजीवनी मिळाली आहे. जुलै महिन्यात आतापर्यंत जिल्ह्यात ४२०.८ मिमी पावसाची नोंद झाली असून, ती जुलै महिन्याच्या सरासरीच्या १४२.९ टक्के आहे. तर गत २४ तासात जिल्ह्यात सरासरी ४७ मिमी पाऊस झाला. बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार गोंदिया तालुक्यात २०.३ मिमी, आमगावमध्ये १७.९ मिमी, तिरोडा ३९.४ मिमी, गोरेगाव २६.८ मिमी, सालेकसा ३३.७ मिमी, देवरी

७४.२ मिमी, अर्जुनी-मोरगाव ८७.८ मिमी, तर सडक-अर्जुनीमध्ये ७६.५ मिमी पावसाची नोंद झाली. देवरी, अर्जुनी मोरगाव आणि सडक-अर्जुनी या तिन्ही तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील नागरिकांना मोठी दिलासा मिळाली आहे.

Monsoon Tourism : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! दरडीच्या धोक्यामुळे रघुवीर घाट १० ऑगस्टपर्यंत बंद; पर्यटकांना नो-एंट्री

रोवणीच्या कामांना येणार वेग

सोमवारी रात्रीपासून जिल्ह्यात सुरू झालेली संततधार बुधवारीही कायम होती. या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, ग्रामीण भागात पिकांसाठी हा पाऊस नवसंजीवनी ठरत आहे. विशेषतः धानपट्ट्यात रखडलेल्या भात रोवणीच्या कामांना आता वेग येण्याची शक्यता आहे. सलग पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणे, तलाव आणि इतर जलसाठ्यांमध्येही वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या समाधानकारक पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पावसाअभावी निर्माण झालेली दुबार पेरणीची भीती आता दूर झाली असून, खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

Web Title: Gondia rain update three talukas heavy rainfall

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 02:51 PM

Topics:  

  • gondiya
  • maharashtra
  • Monsoon

संबंधित बातम्या

Farmer Loan Waiver: अखेर शेतकऱ्याला न्याय! कर्जमाफीपासून वंचित ठेवणाऱ्या सोसायटी व बँकेला ग्राहक आयोगाचा दणका
1

Farmer Loan Waiver: अखेर शेतकऱ्याला न्याय! कर्जमाफीपासून वंचित ठेवणाऱ्या सोसायटी व बँकेला ग्राहक आयोगाचा दणका

Dharashiv ZP Schools: धाराशिव विकासासाठी मोठे निर्णय; शाळा एकत्रीकरण, विद्युत शवदाहिनी आणि 35 कोटींचे वृक्षारोपण
2

Dharashiv ZP Schools: धाराशिव विकासासाठी मोठे निर्णय; शाळा एकत्रीकरण, विद्युत शवदाहिनी आणि 35 कोटींचे वृक्षारोपण

Monsoon Car Hacks: पावसाळ्यात काचांवर पाणी न साचण्यासाठी कोणते कोटिंग उत्तम? जाणून घ्या
3

Monsoon Car Hacks: पावसाळ्यात काचांवर पाणी न साचण्यासाठी कोणते कोटिंग उत्तम? जाणून घ्या

CM Fadnavis Birthday: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी रोजगार अन् कौशल्य विकासाचा संकल्प दृढ – मंत्री मंगल प्रभात लोढा
4

CM Fadnavis Birthday: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी रोजगार अन् कौशल्य विकासाचा संकल्प दृढ – मंत्री मंगल प्रभात लोढा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.