भाजपसोबत गेलेला नेता कालांतराने कितीही मर्द असला तरी सरपटणारा प्राणी होतो; संजय राऊत
Sanjay Raut News: भाजपसोबत सोयरिक केलेला कोणताही नेता कालांतराने कितीही मर्द असला तरी तो सरपटणारा प्राणी होतो, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी थेट मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी छगन भुजबळ यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात गंभीर आरोप झाल्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्या. त्यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या मंत्रीपदाची जागा रिक्त झाली होती. गेल्या आठवड्यात छगन भुजबळ यांनी त्या रिक्त जागेवर छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. भुजबळ यांच्याकडे आता अन्न व नागरी पुरवठा विभागाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. धनंजय मुंडेंकडे असणारे खाते भुजबळ यांच्याकडे देण्यात आले आणि भुजबळ यांची पुन्हा मंत्रिमंडळात एंट्री झाली.
एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवीच्या आई- वडिलांची भेट; आरोपींवर कठोर कारवाईचं दिलं आश्वासन
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भुजबळ यांनी, निवडणूक जिंकल्यानंतर पक्षानेच मला आमदारकीचा राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. तसेच धनंजय मुंडे यांना क्लीन चीट मिळाली तर मी राजीनामा देईन, अशी प्रतिक्रीया दिली होती. भुजबळ यांच्या या प्रतिक्रीयेवर संजय राऊत यांनी जहरी टीका केली आहे. “अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे जे पक्ष आहेत ते चोरलेले आहेत. ते त्यांचे पक्ष नाहीत. त्यामुळे भुजबळ यांनी कितीही सांहितले की, मला मंत्री करण्यात तरी अमित शाह, नरेंद्र मोगी, आणि देवेंद्र फडणवीस यांचे योगदान आहे. पण त्यांनी कधी अजित पवारांचे नाव घेतलं का, असा सवालसंजय राऊत यांनी उपस्थित केला. इतकेच नव्हे तर, भाजपसोबत सोयरिक केलेला कोणताही नेता कालांतराने कितीही मर्द असला तरी तो सरपटणारा प्राणी होतो, अशा शब्दांत भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठरवलं तर छगन भुजबळ पालकमंत्री काय तिसरे उपमुख्यमंत्रीदेखील होऊ शकतात. अशी टिपण्णी केली होती. त्यावरही बोलताना संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ” भाजप एकेकाळी एकही उपमुख्यमंत्री करण्यास तयार नव्हता. पण आता त्यांच्या मनात आले तर ते चार उपमुख्यमंत्रीही नेमू शकतात. भाजपचे आता काही खरे नाही, छगन भुजबळ आता भाजपमध्ये आहेत. तेआताही अमित शहांच्याच पक्षात आहेत. तांत्रिकदृष्ट्या तांत्रिक दृष्ट्या ते दुसऱ्या गटात आहे. भुजबळ यांनी अमित शाहांचे यांचे नेतृत्व मानले आहे. ज्या अमित शाहांनी शिवसेनेचे तुकडे केले, आता त्यांना मुंबई आणि महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत. भुजबळही आज त्याच भुजबळ आहेत. हेच भुजबळ कधीकाळी मराठी माणसासाठी आणि सीमा प्रश्नासाठी रस्तावर उतरून संयुक्त महाराष्ट्रासाठी लढले होते , असे म्हणत त्यांनी भुजबळांवर निशाणा साधला.
‘लोकांना मारण्यासाठी धर्माचा वापर केला…’ बहरैनमध्ये असदुद्दीन ओवैसी पाकिस्तानवर पुन्हा कडाडले
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. या पार्श्वभूमीवर विचारले असता, खासदार संजय राऊत यांनी यास दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, “यात चर्चेचं काय आहे? मी थेट सांगतो—ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. सध्या पडदा उघडण्याची वेळ नाही, पण तो योग्य वेळी उघडला जाईल.”
उद्धव ठाकरे यांची भूमिका सकारात्मक असल्याचेही राऊत यांनी नमूद केले. “महाराष्ट्रातील जनतेच्या मनात जर भावना असेल, तर हा प्रयोग करून पाहायला हरकत नाही,” असे उद्धव ठाकरे म्हणाल्याचे त्यांनी सांगितले. ईव्हीएम घोटाळ्यामुळे जागा कमी मिळाल्या असल्या तरी महाराष्ट्रात शिवसेना हा प्रमुख पक्षच राहिल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले. “मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी जर सर्व गट-तट बाजूला ठेवून एकत्र आले, आणि गुजरातच्या व्यापाऱ्यांच्या छाताडावर बसले, तर तीच खरी बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना ठरेल,” अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली.