Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shiv Sena : मुंबईत शिवसेनेचा उबाठा गटाला धक्का, तीन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेनेच्या वर्धापनदिनीच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या तीन माजी नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 19, 2025 | 06:52 PM
मुंबईत शिवसेनेचा उबाठा गटाला धक्का, तीन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश (फोटो सौजन्य-X)

मुंबईत शिवसेनेचा उबाठा गटाला धक्का, तीन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याने प्रभावित होऊन आज मुंबईतील उबाठा गटाच्या तीन माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. याशिवाय ठाणे तसेच गोवा राज्यातील उबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. ठाण्यातील मातोश्री स्व. गंगुबाई संभाजी शिंदे सभागृहात झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात आमदार दिलीप लांडे, शिवसेना सचिव राम रेपाळे उपस्थित होते. या पक्ष प्रवेशाने शिवसेना वर्धापन दिनीच मुंबईत उबाठाला मोठा धक्का बसला आहे.

पुण्यातील प्रसिद्ध भिडे पूल पाण्याखाली; खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग वाढवला

आज (19 जून) उबाठाचे विभागप्रमुख आणि माजी नगरसेवक अजित भंडारी, शाखाप्रमुख संजय जंगम, प्रभाग क्रमांक १६१ चे उबाठा गटाचे माजी नगसेवक विजेंद्र शिंदे, प्रभाग क्रमांक १४० च्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नगरसेविका नादिया शेख आणि शिवसेना युवा सेना सचिव मोहसीन शेख यांनी आज उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. तसेच गोवा राज्यातील उबाठा गटाचे माजी राज्य प्रमुख उपेंद्र गावकर, काँग्रेस महासचिव काशिनाथ मयेकर, पाच तालुकाप्रमुख, एक शहर प्रमुख, विभागप्रमुख आणि कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला.

ठाण्यातील रामचंद्रनगर शाखेचे उबाठाचे उपविभागप्रमुख मोहन चव्हाण, विजय काते, विजय पवार, महादेव कदम, प्रवीण बामणे आणि अनेक उपशाखाप्रमुख, गटप्रमुख यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत सामील झालेल्या लोकप्रतिनिधींच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. त्यांच्या प्रभागांतील विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

“गेल्या साडेतीन वर्षापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा अजेंडा घेऊन मी चांदीवली विधानसभा मतदारसंघांमध्ये विधानसभा संघटक म्हणून माझं काम करत आहे. मधल्या काळात काही संघटनात्मक बदल झाले. आम्ही वाईट काळामध्ये संघटनेसोबत ठामपणे काम करत होतो. वरिष्ठांच्या नेमणुका झाल्यानंतर त्यांनी आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला. ते खूप मनाला लागले. जेव्हा गरज होती तेव्हा आम्ही रस्त्यावर उतरत होतो. आमचा रोष स्थानिक पदाधिकाऱ्यांवर आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पदावर आल्या आल्या काही शाखाप्रमुखांना काढलं. मलाही बाजूला केलं हे आमच्या मनाला लागलं, असं माजी नगरसेवक विजेंद्र शिंदे यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

नाव मोठं लक्षण खोटं…, पालिका शाळेच्या इमारतीचं प्लास्टर कोसळले; पालिका आयुक्त ठेकेदारासह अधिकाऱ्यांवर होणार कारवाई?

Web Title: A setback for the shiv sena faction in mumbai three former corporators join shiv sena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2025 | 06:52 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Mumbai
  • shivsena

संबंधित बातम्या

Thane Municpal News: माझ्या नवऱ्याने यांच्या बायका पळवून नेल्या काय? मीनाक्षी शिंदेंची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल
1

Thane Municpal News: माझ्या नवऱ्याने यांच्या बायका पळवून नेल्या काय? मीनाक्षी शिंदेंची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल

Maharashtra Politics: खुर्चीसाठी काहीपण! महाराष्ट्रात काहीही घडतंय, शिवेसना-NCP सह असदुद्दीन ओवैसी AIMIM हातमिळवणी
2

Maharashtra Politics: खुर्चीसाठी काहीपण! महाराष्ट्रात काहीही घडतंय, शिवेसना-NCP सह असदुद्दीन ओवैसी AIMIM हातमिळवणी

Thane Election:  शिंदे यांचे जवळचे सहकारी 7 वर्षात मालामाल! ठाण्यातील ‘या’ उमेदवारांची एकूण आकडा वाचून बसेल आश्चर्याचा धक्का!
3

Thane Election: शिंदे यांचे जवळचे सहकारी 7 वर्षात मालामाल! ठाण्यातील ‘या’ उमेदवारांची एकूण आकडा वाचून बसेल आश्चर्याचा धक्का!

Navi Mumbai Election : “आमची लढाई “नाईक जनता पार्टी” विरोधात” ; नरेश म्हस्केंचा गणेश नाईकांवर हल्लाबोल
4

Navi Mumbai Election : “आमची लढाई “नाईक जनता पार्टी” विरोधात” ; नरेश म्हस्केंचा गणेश नाईकांवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.