55 ठिकाणी स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीची गरज
नवी मुंबई/ सिद्धेश प्रधान : नेरुळ सेक्टर 30 मधील भूखंड क्रमांक 8अ वर सुमारे 7.75कोटी खर्चुन नव्याने उभारण्यात आलेली आहे. कोणतीही व्यवस्था नसताना या शाळेत शिक्षण विभागाने वर्ग सुरू केले. आता मात्र याच शाळेतील वर्गाचा स्लॅबचे प्लास्टर कोसळून पडले. या घटनेने शाळेच्या निकृष्ट दर्जाच्या इमारतीचे कामकाज समोर आले आहे. या घटनेला जबाबद्र असणाऱ्या कंत्राटदार तसेच संबंधित अधिकाऱ्यांना आयुक्त शिंदे पाठीशी घालणार की कारवाई करणार ? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. तर बाहेरून सुंदर रंगरंगोटी केलेल्या शाळेच्या आतील भागातील पोकळ वसा समोर आला आहे. शिक्षिकेच्या डोक्यावर प्लास्टर पडले यामुळे त्या किरकोळ जखमी झाल्या तर विद्यार्थी बचावले. सुदैवाने यात कोणासही गंभीर दुखापत झाली नसली तरी भ्रष्ट कारभार मात्र समोर आला आहे.
शाळेची इमारत ही प्राथमिकदृष्ट्या निकृष्ट दर्जाचे बांधकाम असून सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक दिसून येत आहे. दिनांक 16जून रोजी शालेय शैक्षणिक वर्ष सुरु झाले आणि शाळा सुरु झाल्यापासून केवळ चौथ्याच दिवशी म्हणजे आज दिनांक 19जून 2025 रोजी इयत्ता 6वी ‘क’ चा वर्ग सुरू असताना अचानक त्या वर्गातील स्लॅबचे मोठे दोन भाग खाली कोसळले. यावेळी वर्गात 36 विद्यार्थी उपस्थित होते. वर्ग शिक्षिकेच्या डोक्यावर ह्या स्लॅबचे प्लास्टर पडल्यामुळे त्यांना डोक्यावर किरकोळ दुखापत झाली. या धक्कादायक घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आणि मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्लॅबचे मोठे भाग कोसळळे त्यातील एक भाग वर्गाच्या मधोमध कोसळला.त्याच मजल्यावर (पहिला मजला) मुख्य बीमच्या मधोमध मोठे तडे (क्रॅक) पडल्यामुळे तेथून पाण्याची संतत धार सुरु आहे. लगतच्या भिंतीवरसुद्धा तडे पडले आहे. गळतीमुळे खाली पडणारे पाणी वाहून एका वर्गामध्ये जमा होत आहे त्यामुळे त्या वर्गाला स्विमिंग पुलाचे स्वरूप आले असल्याचे निदर्शनास आले.शाळेच्या इमारतीच्या टेरेसवर ठेवलेल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या तीन टाक्यांपैकी एक टाकी तुटून खाली पडली आहे. मुळात शाळेच्या टेरेसवर प्लास्टिकच्या टाक्यांऐवजी सिमेंटची टाकी असणे अपेक्षित आहे. शासनाने शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावणे अनिवार्य केले असून सुद्धा ह्या शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अद्याप बसवण्यात आलेले नाहीत. विद्यार्थ्यांच्या शौचालयाबाहेर कोणताही सूचना फलक/चिन्ह लावलेले नाही. संपूर्ण इमारत फिरून पहिली असता करण्यात आलेले बांधकाम निकृष्ट दर्जाचे, निष्काळजीपणा दर्शवत आहे. ही गंभीर दुर्घटना कोणतीही जीवितहानी न होता टळली, याचे नशीब मानावे लागते. मात्र यामुळे शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराची तत्काळ चौकशी करून त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावे. संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून प्रशासनिक कारवाई करण्यात यावी.संपूर्ण इमारतीची तांत्रिक तपासणी करून संभाव्य धोके दूर करण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्यात याव्यात. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळेच्या सर्व भागांमध्ये सीसीटीव्ही प्रणाली तत्काळ बसवण्याचे आदेश देण्यात यावेत. सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या शौचालयांसमोर स्पष्ट सूचना फलक लावण्याचे आदेश द्यावेत.अन्यथा भविष्यात जीवितहानीसारखी दुर्घटना घडल्यास जबाबदार ठेकेदार व अधिकारी यांना थेट उत्तरदायी धरावे, असं ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख समीर बागवान यांनी सांगितलं आहे.या वेळी उपजिल्हाप्रमुख सुमीत्र कडू, विभाग प्रमुख मिलिंद भोईर, विशाल विचारे, युवा सेना शाखा अधिकारी अक्षय गमरे सोबत उपस्थित होते.