Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संसदेचे विशेष अधिवेशन देशाचे तुकडे करण्यासाठी; नाना पटोले यांचा गंभीर आरोप

संसदेचे विशेष अधिवेशन देशाचे तुकडे करण्यासाठी बोलावले असून, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून केंद्र शासित प्रदेश करण्याचा मोदी सरकारचा डाव आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 11, 2023 | 01:32 PM
संसदेचे विशेष अधिवेशन देशाचे तुकडे करण्यासाठी; नाना पटोले यांचा गंभीर आरोप
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मोदी सरकारने १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. विशेष अधिवेशनाचा अजेंडा सरकारने दिलेला नाही. विरोधी पक्ष, संसदीय कामकाज समितीसह कोणालाही न विचारता मोदी सरकारने हे अधिवेशन बोलावले आहे. संसदेचे विशेष अधिवेशन देशाचे तुकडे करण्यासाठी बोलावले असून, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून केंद्र शासित प्रदेश करण्याचा मोदी सरकारचा डाव आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, कोरोना संकटावेळी विशेष अधिवेशन बोलावले नाही, नोटबंदीच्यावेळी विशेष अधिवेशन बोलावले नाही, मणिपूरच्या मुद्यावरही विशेष अधिवेशन बोलावले नाही पण आपल्या लहरी व मनमानीपणाने आता विशेष अधिवेशन बोलावले आहे. मुंबई हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शहर आहे, देशाची आर्थिक राजधानी आहे, महाराष्ट्राची, देशाची शान आहे आणि हेच भाजपाला खुपत असल्याने मुंबईतील सर्व शक्तीस्थाने गुजरातला घेऊन जायचा मोदी सरकारचा प्लॅन आहे.

मुंबईचे महत्व कमी करण्याचे काम मागील ९ वर्षात अनेकदा झाले आहेत. जागतिक वित्तिय केंद्र गुजरातला पळवले, मुंबईतील मोठा हिरे व्यापार गुजरातला पळवला, मुंबईतील एअर इंडियाचे मुख्यालय मुंबई बाहेर हलवले. आता मुंबईतील ‘बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज’ (BSE ), आणि ‘नॅशनल स्टॉक एक्स्चेंज’ (NSE ) सुद्धा गुजरातला घेऊन जायचा डाव आहे. मुंबईला तोडण्याचे मोदी सरकारचे षडयंत्र आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार अडथळा ठरत होते म्हणूनच केंद्र सरकार व राज्यपाल यांच्या मदतीने मविआचे सरकार पाडले.

आता शिंदेंच्या नेतृत्वखालील सरकार आल्यापासून मुंबई व महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प गुजरातले पळवून नेले. याविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसलाही विरोध करण्याची हिम्मत दाखवली नाही. शिंदे- फडणवीस व पवार यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी मुंबईतील महत्वाची कार्यालये व प्रकल्प बाहेर घेऊन जात असल्याबद्दल नरेंद्र मोदी यांना जाब विचारून दाखवावा, असेही नाना पटोले म्हणाले.

Web Title: A special session of parliament to divide the country serious allegations of nana patole nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2023 | 01:32 PM

Topics:  

  • BJP
  • congress nana patole
  • DCM Devendra Fadanvis
  • maharashtra
  • Mumbai

संबंधित बातम्या

महाराष्ट्रात वसलेलं ही ठिकाणं म्हणजे भारतातील इटलीच… इथे एकदा जाल तर परत येण्याची इच्छाच होणार नाही
1

महाराष्ट्रात वसलेलं ही ठिकाणं म्हणजे भारतातील इटलीच… इथे एकदा जाल तर परत येण्याची इच्छाच होणार नाही

BMC Election 2026: पदयात्रा आणि घरोघरी प्रचारामुळे राजकारण्यांची भूक वाढली! समोसे, वडापाव आणि बिर्याणीच्या मागणीत २५% वाढ
2

BMC Election 2026: पदयात्रा आणि घरोघरी प्रचारामुळे राजकारण्यांची भूक वाढली! समोसे, वडापाव आणि बिर्याणीच्या मागणीत २५% वाढ

Deepak Kesarkar: “निवडणूक आयोगावर आक्षेप घेणाऱ्यांना पराभव डोळ्यासमोर दिसतोय…”, दिपक केसरकर यांची संजय राऊतांवर टीका
3

Deepak Kesarkar: “निवडणूक आयोगावर आक्षेप घेणाऱ्यांना पराभव डोळ्यासमोर दिसतोय…”, दिपक केसरकर यांची संजय राऊतांवर टीका

Nagpur Municipal Election 2026 : नागपूर महापालिका निवडणुकीत ४४७ मतदान केंद्रे संवेदनशील; गांधीबाग झोनमध्ये सर्वाधिक केंद्रे
4

Nagpur Municipal Election 2026 : नागपूर महापालिका निवडणुकीत ४४७ मतदान केंद्रे संवेदनशील; गांधीबाग झोनमध्ये सर्वाधिक केंद्रे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.