आश्रमशाळेतील पाण्याची टाकी कोसळून विद्यार्थिनीचा मृत्यू (File Photo : Wall Collapsed)
पाटण : त्रिपुडी (ता. पाटण) येथे मुसळधार पावसामुळे रात्रीच्या सुमारास राहत्या घराच्या दोन्ही भिंती व छप्पर कोसळून घरातील जीवनावश्यक वस्तू भिंतीच्या ढिगाऱ्याखाली गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यात जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी झाली असून या घटनेचा अद्यापही पंचनामा करण्यात आला नव्हता.
हेदेखील वाचा : राजकोट किल्ल्यावर ठाकरे-राणे समर्थकांमध्ये प्रचंड राडा; आदित्य ठाकरेंनी दिला अल्टिमेटम, पुढच्या…
पाटणसह परिसरात गेल्या ८ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. दिवस-रात्र पाऊस पडत असल्याने घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. त्यातच पडझडीच्या घटनेत वाढ झाली आहे. त्रिपुडी येथील श्रीमती विमल रामचंद्र देसाई यांच्या राहत्या घराच्या दोन्ही भिंती व छप्पर मुसळधार पावसामुळे सोमवारी रात्रीच्या सुमारास अचानक कोसळले.
भिंतीच्या ढिगाऱ्याखाली घरातील गॅस, भांडी व संसारोपयोगी साहित्य गेल्याने आर्थिक नुकसान मोठे झाले आहे. यात जीवितहानी मात्र झालेली नाही. या घटनेचा पंचनामा अद्यापही महसूल विभागाकडून करण्यात आला नाही. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेवून घटनेचा पंचनामा करावा व संबंधितास नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
अखेर पंचनामा करण्याच्या सूचना
भिंती व छप्पर कोसळून घरातील जीवनावश्यक वस्तू भिंतीच्या ढिगाऱ्याखाली गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेबाबत तहसीलदार अनंत गुरव यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी तत्काळ मंडल अधिकारी यांना सूचना करून पंचनामा करण्याचे सांगितले आहे.
हेदेखील वाचा : विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र; पुतळा अपघाताने कोसळला म्हणणाऱ्या केसरकरांचा घेतला खरपूस समाचार