Photo : Malvan Incident
मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. अवघ्या आठ महिन्यात हा पुतळा कोसळल्याने विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. यानंतर मालवणमध्ये प्रचंड रोष निर्माण झाल्याचे पाहिला मिळत आहे. ठाकरे गटाचे समर्थक आणि राणे समर्थक आमनेसामने आले आहेत. या दोन्ही गटांमध्ये प्रचंड राडा होत असल्याचे समोर आले आहे.
हेदेखील वाचा : ‘माझ्याकडे कोणतीही वर्कऑर्डर नाही’; पुतळा कोसळण्याच्या घटनेवर चेतन पाटील यांचा दावा
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने विरोधकांकडून जोरदार निशाणा साधला. या परिसरात आदित्य ठाकरे पाहणी करण्यासाठी गेले होते. मात्र, त्याचवेळी भाजप तसेच राणे समर्थकही आक्रमक झाले. त्यामुळे ठाकरे समर्थक आणि राणे समर्थकांमध्ये प्रचंड राडा झाल्याचे पाहिला मिळाले. परिसरात दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी पोलिसांचेही मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु आहेत.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘गृहमंत्र्यांना बोलायला वेळ नाही. आम्ही शांतपणे येत होतो. मात्र, अचानक हे सर्व घडलं. पुतळा कोसळण्याची ही घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि लाजिरवाणी आहे. येत्या 15 मिनिटांत हे कार्यकर्ते इथून गेले नाहीत तर शिवसेनेची काय ताकद आहे हे दाखवून देऊ, अशा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
हेदेखील वाचा : विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र; पुतळा अपघाताने कोसळला म्हणणाऱ्या केसरकरांचा घेतला खरपूस समाचार