मयुर फडके, मुंबई : शिक्षण (Education) घेणे हा मूलभूत अधिकार (Fundamental Rights) असून हा अधिकार कोणालाही नाकारता येणार नाही (This right cannot be denied to anyone), असे निरीक्षण नोंदवून विशेष न्यायालयाने (Special Court) परीक्षेला बसण्यास इच्छुक असलेल्या बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (POSCO) दाखल खटल्यातील आरोपीला परीक्षेसाठी केंद्रावर पोलीस सुरक्षा शुल्क जमा न करता उपस्थित राहण्यास परवानगी दिली.
अपल्पवीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेला आरोपी बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्सचा (बीसीए) विद्यार्थी असून जानेवारीपासून तो ठाणे जिल्ह्यातील कारागृहात आहे. बीसीएची प्रात्यक्षिक परीक्षा सुरू झाल्यामुळे परीक्षेला बसण्याकरिता अंतरिम जामीन देण्यात यावा किंवा कारागृह ते परीक्षा केंद्र यादरम्यान लागणाऱ्या पोलीस सुरक्षेचे शुल्क माफ करण्याची मागणी आरोपीने केली होती.
[read_also content=”Cannes 2023: सनी लिओनच्या कान्स मधल्या ‘त्या’ अदा पाहून चाहते झाले तिच्यावर ‘फिदा’ https://www.navarashtra.com/web-stories/after-seeing-sunny-leone-killer-look-performance-in-cannes-2023-fans-were-fida-on-her-katil-ada-nrvb/”]
वडील अर्धांगवायूमुळे अंथरुणात आहेत आणि कुटुंबाची पोलीस सुरक्षा शुल्क भरण्याऐवढी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे पोलीस सुरक्षा शुल्क माफ करण्याची मागणीही आरोपीने केली होती. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. एम. टाकळीकर यांनी आरोपीची पोलीस सुरक्षा शुल्क माफ करण्याची मागणी मान्य केली.
[read_also content=”आजचे राशीभविष्य : 24 May 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-24-may-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]