अहिल्यानगरमधील संगमनेरमध्ये शाळकरी 6वीतील मुलीवर ॲसिड हल्ला करण्यात आला (फोटो - सोशल मीडिया)
शाळेमध्ये इयत्ता सहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर अज्ञात नराधमाने भररस्त्यात ॲसिड फेकून हल्ला केला. या अमानवी कृत्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज वडगावपान ग्रामस्थांनी कडकडीत बंदची हाक दिली आहे. तसेच रास्ता रोको आंदोलन देखील केले आहे. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने या मुलीवर अॅसिट हल्ल्या करण्यात आला. यामध्ये पीडित मुलीच्या चेहऱ्याचा उजवा भाग सुमारे ७ ते १० टक्के भाजला आहे.
हे देखील वाचा : “एकनाथ शिंदेंचा पक्ष म्हणजे भाजपची अंगवस्त्र…; खासदार संजय राऊतांची खरपूस टीका
पीडित मुलीची शाळा तिच्या राहत्या घरापासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आहे. ती सायकलवरुन घरी जात होती. यावेळी मुख्य रस्त्यापासून वस्तीकडे जाणाऱ्या निर्जन रस्त्यावर नराधमाने पीडित मुलीला गाठले. तिला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सायकल थांबवण्यास सांगितली. आणि तिच्यावर अॅसिट हल्ल्या केला. यानंतर नराधमाने दुचाकीवरुन घटनास्थळाहून पळ काढला. यामध्ये जखमी झालेल्या चिमुरडीने आरडाओरडा केला. यावेळी शेतकाम करणाऱ्या महिलांनी तिच्या मदतीसाठी धाव घेतला.
पीडित मुलगी ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर हल्ला झाल्यानंतर जखमी अवस्थेमध्ये तिला लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. याबाबत रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, पीडित चिमुरड्याच्या चेहऱ्यावरील उजवा भाग 8 ते 10 टक्के भाजला आहे. सध्या चिमुरडीवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती स्थिर आहे. आज तिच्यावर प्लास्टिक सर्जरी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हे देखील वाचा : इतिहास घडला! LGBTQ+ समुदायाला संसदेत प्रतिनिधित्व; जाणून घ्या कोण आहेत मेनका गुरुस्वामी?
पीडित मुलीची घराची परिस्थिती ही अत्यंत हलाखीची आहे. तिच्या वडिलांचे निधन झाले असून ती आईसह मामाच्या घरी राहते. ती आपल्या आई आणि भावासोबत मामा व आजी-आजोबांकडे राहत होती. तिची आई मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलांचे शिक्षण पूर्ण करत आहे. आमची कोणाशीही दुश्मनी नसताना माझ्या निष्पाप मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न का झाला?” अशी आर्त हाक पीडित मुलीच्या आईने देत टाहो फोडला. याप्रकरणी मुलीच्या आईने आणि मामाने आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे.






