Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बुलढाण्यात पाणीटंचाईवर प्रशासनाचा मोठा निर्णय; ५१ गावांत ५८ विंधन विहिरी आणि १० कुपनलिका मंजूर

बुलढाणा जिल्ह्यातील वाढत्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. Pravin Kumar Deore यांनी २०२५-२६ या कालावधीसाठी खामगाव, शेगाव आणि मलकापूर तालुक्यातील ५१ गावांमध्ये ५८ विंधन विहिरी आणि १० कुपनलिका मंजूर केल्या आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 27, 2026 | 09:25 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • मंजूर कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला देण्यात आले आहेत.
  • मंजूर कामे ३० जून २०२६ पूर्वी पूर्ण न झाल्यास मंजुरी आपोआप रद्द होणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी Pravin Kumar Deore यांनी २०२५-२६ या कालावधीसाठी खामगाव, शेगाव आणि मलकापूर तालुक्यातील ५१ गावांमध्ये ५८ विंधन विहिरी आणि १० कुपनलिका मंजूर केल्या आहेत. जिल्हा परिषदेकडून प्राप्त प्रस्ताव, तसेच तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि भूवैज्ञानिकांच्या अहवालानंतर ही प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. शासनाच्या ३ फेब्रुवारी १९९९ च्या निर्णयानुसार मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला असून, मंजूर कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला देण्यात आले आहेत.

अजित पवारांच्या विमान अपघाताला ४ महिने पूर्ण; रोहित पवारांचा फडणवीस सरकारवर निशाणा, CID तपासावरही उपस्थित केले प्रश्न!

खामगाव तालुक्यातील लाखणवाडा बु., जळका भडंग, नायदेवी, हिवरखेड, चिचपूर यांसह अनेक गावांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. तसेच शेगाव तालुक्यातील सवर्णा, माटरगाव बु., घुई, जाणोरी, भोनगाव, खातखेड आणि मलकापूर तालुक्यातील दाताळा, देवधाबा, बलाड, वाघूड, भडाग्ना, धरणगाव, रनथम आदी गावांमध्येही उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट निर्देश देताना सांगितले की, नव्या विंधन विहिरी किंवा कुपनलिका सुरू करण्यापूर्वी नादुरुस्त हातपंप दुरुस्त करण्यास प्राधान्य दिले जावे. सर्व कामांचे जिओ-टॅगिंग करून छायाचित्रांसह नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. मंजूर कामे ३० जून २०२६ पूर्वी पूर्ण न झाल्यास मंजुरी आपोआप रद्द होणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Ratnagiri news : धरणात पाणी मुबलक, तरी कोळथरे ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण; पाईपलाईन दुरुस्तीकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष?

याशिवाय, विंधन विहिरी पूर्ण झाल्यानंतर संबंधित गावात पुरेसे पाणी उपलब्ध झाल्यास टँकरद्वारे किंवा खाजगी विहिरी अधिग्रहणाद्वारे सुरू असलेला पाणीपुरवठा बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अपूर्ण राहिलेल्या कामांचे देयक पाणीटंचाई निधीतून अदा केले जाणार नसल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ अंतर्गत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले असून, कामांच्या प्रगतीचा साप्ताहिक अहवाल प्रत्येक गुरुवारी सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

Web Title: Administration takes major decision on water scarcity in buldhana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 09:25 PM

Topics:  

  • buldhana news
  • Washim news

संबंधित बातम्या

Buldhana News: १५,४११ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित, वीज वितरणचा सापत्नभाव; श्रीमंतांना अभय, सर्वसामान्यांची कापली वीज
1

Buldhana News: १५,४११ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित, वीज वितरणचा सापत्नभाव; श्रीमंतांना अभय, सर्वसामान्यांची कापली वीज

Buldhana News : धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद! गिरडा परिसरातील शेतकऱ्यांच्या पशुधनावर केला होता हल्ला
2

Buldhana News : धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद! गिरडा परिसरातील शेतकऱ्यांच्या पशुधनावर केला होता हल्ला

Buldhana News : एसटी बसस्थानक परिसरात वृक्षारोपण! राज्य परिवहन विभागीय कार्यालयातर्फे पर्यावरणाचा संदेश
3

Buldhana News : एसटी बसस्थानक परिसरात वृक्षारोपण! राज्य परिवहन विभागीय कार्यालयातर्फे पर्यावरणाचा संदेश

Buldhana News : बुलढाण्यात धक्कादायक घटना; दाम्पत्याला शस्त्राचा धाक दाखवत विवाहितेवर सामूहिक लैंगिक अत्याचार
4

Buldhana News : बुलढाण्यात धक्कादायक घटना; दाम्पत्याला शस्त्राचा धाक दाखवत विवाहितेवर सामूहिक लैंगिक अत्याचार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.