अजित पवारांच्या विमान अपघाताला ४ महिने पूर्ण; रोहित पवारांचा फडणवीस सरकारवर निशाणा (Photo Credit- X)
रोहित पवार यांनी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून एक प्रश्न विचारला. अजितदादांच्या अपघाताला उद्या ४ महिने होतील. अधिवेशनात बोलताना तुम्ही गुन्हेगारांना पाताळातून शोधून काढण्याचा, CBI चौकशीबाबत अमित शहा साहेबांकडे पाठपुरावा करण्याचा तसंच कर्नाटकात नोंद झालेली झिरो FIR महाराष्ट्रात वर्ग करून घेण्याचा शब्द दिला होता. आपण शब्द देऊन अडीच महिने होत आले, या अडीच महिन्यात काय कार्यवाही झाली हे आपणच सांगावे.
आदरणीय मुख्यमंत्री साहेब… अजितदादांच्या अपघाताला उद्या 4 महिने होतील. अधिवेशनात बोलताना तुम्ही गुन्हेगारांना पाताळातून शोधून काढण्याचा, CBI चौकशीबाबत अमित शहा साहेबांकडे पाठपुरावा करण्याचा तसंच कर्नाटकात नोंद झालेली झिरो FIR महाराष्ट्रात वर्ग करून घेण्याचा शब्द दिला होता. आपण… — Rohit Pawar (@RRPSpeaks) May 27, 2026
पुढे म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांसोबत गेल्या अडीच महिन्यात आपल्या असंख्य बैठका झाल्या असतील त्यामध्ये सीबीआय चौकशीचा मुद्दा आपण घेतला नसेल तर आज होणाऱ्या बैठकीत तरी हा मुद्दा आग्रहाने घ्यायला हवा. राष्ट्रवादीचे मंत्री उपस्थित असतील तर त्यांनी देखील पाठपुरावा करायला हवा. मित्र हयात असला किंवा नसला तरी मित्रासाठी मैत्री नेहमीच जिवंत असते, ही सर्वसामान्य जनतेची भावना असते, राजकीय लोकांसाठी ही भावना वेगळी आहे का ? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
राहिला प्रश्न CID चौकशीचा तर CID काय करते नेमकं हेच कळत नाही. गेल्या 28 तारखेला CID कार्यालयात गेलो असता तपास अधिकारीच उपस्थित नव्हते, त्यांना mail करून अनेक नवे पुरावे दिले, पत्र स्वतः जाऊन दिले तरी त्यांचा काहीही प्रतिसाद नाही. अजितदादांच्या अपघात प्रकरणात सीआयडी करत असलेला तपास बघता, CID सारख्या कुचकामी यंत्रणा म्हणजे बिनकामाचे ओझेच म्हणावे लागेल. असो, उद्या सीआयडी ऑफिसची वेळ मागितली असून उद्या सकाळी 10.30 वाजता भेट देणार आहे. CID ऑफिसला कदाचित सनदशीर मार्गाची भाषा समजत नसेल तर वेगळ्या भाषेत सांगावे लागेल.
येथे हे नमूद करणे महत्त्वाचे आहे की, या वर्षी २८ जानेवारी रोजी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले होते. या अपघातात तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांसह एकूण पाच जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर, रोहित पवार यांनी या प्रकरणाच्या पारदर्शक तपासाची सातत्याने मागणी केली आहे. जेव्हा महाराष्ट्रात एफआयआर (FIR) दाखल करून घेतला गेला नाही, तेव्हा त्यांनी कर्नाटकात जाऊन ‘झिरो एफआयआर’ (Zero FIR) दाखल केला, जो नंतर पुन्हा महाराष्ट्राकडे हस्तांतरित करण्यात आला. रोहित यांचा असा दावा आहे की, विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे आश्वासन दिले होते की, गुन्हेगार “पाताळात लपले तरीही त्यांना शोधून काढले जाईल” आणि सीबीआय (CBI) चौकशीसाठी ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करतील; मात्र, आजपर्यंत त्या दिशेने कोणतीही ठोस पावले उचलली गेलेली नाहीत.
“१०-१५ तास लाईनमध्ये थांबूनही शेतकऱ्यांना…” इंधन तुटवड्यावरून रोहीत पवार यांचा सरकारवर निशाणा






