फोटो सौजन्य: iStock
सावन वैश्य | नवी मुंबई:– नवी मुंबई पोलिसांनी नेरूळमध्ये कारवाई करून आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा परदाफाश केला होता. यामध्ये आत्महत्या केलेल्या गुरुनाथ चिंचकर यांच्या मुलांची नावे समोर आली होती. यापैकी मुंबई नारकोटीक विभागाने नवीन चिचकर याला मलेशिया पोलिसांच्या मदतीने अटक करून ताब्यात घेतले होते. नवी मुंबई पोलिसांनी देखील चौकशीसाठी त्याच्या कस्टडीची मागणी केल्यावर, नवी मुंबई पोलिसांनी नवीन चिचकर याचा ताबा घेटला आहे.
नवी मुंबई पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार हायड्रो गांजाची विक्री होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सदर ठिकाणी छापा मारून त्या ठिकाणावरून २ लाख ७६ हजार ५०० रुपयांचा गांजा हस्तगत केला होता. यामध्ये गुरुनाथ चिंचकर यांच्या दोन मुलांची नावे समोर आल्याने, नवी मुंबई पोलिसांनी तपासाचा ससेमीरा गुरुनाथ चिंचकर यांच्या मागे लावला होता. कारण गुरुनाथ चिंचकर यांची दोनही मुले शोध घेऊन मिळून आली नव्हती. त्या दृष्टीने नवी मुंबई पोलिसांनी तपास सूत्र वेगाने सुरू केली होती. सदर प्रकरणात नवी मुंबईतील दोन पोलीस अंमलदार सचिन भालेराव व सचिन फुलकर यांची नावे समोर आली होती. मात्र संवेदनशील पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दोन्ही पोलिस अंमलदारांवर कारवाई केली होती.
मुंबई पोलिसांच्या नारकोटीक विभागाने नवीन गुरुनाथ चिंचकर याला मलेशिया पोलिसांच्या मदतीने अटक करून त्याला मुंबईत आणले होते. मात्र नवी मुंबई आयुक्तालय हद्दीतील गुन्ह्यात नवीन चिंचकर याचा सहभाग आढळून आल्याने नवी मुंबई पोलिसांनी नवीन चिंचकर याची चौकशीसाठी ताबा मागितला होता. नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत अमली पदार्थाची विक्री करणारे कस्टम अधिकारी, डाक विभागाचे अधिकारी, यांच्यावर कारवाई केली होती. मात्र आता नवीन चिचकरची कस्टडी नवी मुंबई पोलिसांना मिळाल्यावर त्याच्याजवळ केलेल्या तपासा अंती आणखीन किती व कोणकोणत्याही गुन्ह्यांचा खुलासा होतो. तसेच आणखी किती गुन्हेगार पोलिसांच्या तावडीत सापडणार हे मात्र पाहावं लागेल.
शेतकऱ्यांनो, पाऊस लांबतोय…! पेरण्यांची करू नका घाई; ‘या’ तारखेनंतर वाढणार पावसाची गती…
नवी मुंबई पोलिसांनी याआधी १६ जणांना अटक केली होती. यामध्ये पुण्यातील दोघाजणांचा समावेश होता. पुण्यातील कुशल याने २ कोटी ७० लाखांचा हायड्रो गांजा ब्लॅक डार्क कुरियर सर्व्हिस च्या माध्यमातून मागवला असल्याच तपासात निष्पन्न झाल होतं. तसेच परमजीत सिंह याचे देखील नाव तपासासमोर आल्याने आतापर्यंत आरोपीची संख्या ही १७ झाली आहे. मात्र नवीन चिंचकर याचा ताबा नवी मुंबई पोलिसांना मिळाल्यावर या प्रकरणात नवीन हा १७ आरोपी ठरला आहे. मुख्य आरोपी के के चंदवानी याचा मुलगा वरून चंदवानी याला सुद्धा नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत अटक केलेल्या आरोपीची संख्या १७ वर गेली असून यातील इतर फरार आरोपीचा शोध नवी मुंबई पोलीस घेत आहेत.