तर मग हजसाठी...Pahalgam Attack नंतर बाळासाहेबांच्या 'या' धाडसी भूमिकेची होतेय चर्चा
काश्मीर जेवढं निसर्गरूपाने बहरलेले आहे तेवढेच दहशतवादी हल्ल्यांमुळे हे शहर बदनाम देखील होत आहे. नुकतेच काश्मीरच्या पहलगाम भागात पर्यटकांवर भ्याड हल्ला झाला आहे. या हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांना टार्गेट केले होते. या हृदयद्रावक हल्ल्यात महाराष्ट्रातील काही लोक मृत्यूमुखी पडले, तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर, देशात संतापाची लाट उसळली आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर देखील प्रत्येक भारतीयांकडून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला सौदी अरेबियातील दोन दिवसीय दौरा अर्धवट सोडून तातडीने भारतात परतण्याचा निर्णय घेतला. मायदेशी परतताना त्यांनी पाकिस्तानच्या एयर स्पेसचा वापर टाळला. यामागे त्यांची सुरक्षेची चिंता आणि भारत सरकारचा पाकिस्तानबद्दलचा रोष ही दोन प्रमुख कारणं असल्याचं सांगितलं जात आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या लक्षणीय घटली आहे. यामध्ये विशेषतः दल लेक परिसर, जो बोटींग आणि निसर्गसौंदर्यासाठी ओळखला जातो, तिथे पर्यटकांची वर्दळ आता कमी झाली आहे. नेहमीच पर्यटकांनी गजबजलेला असलेला हा परिसर सध्या ओसाड भासत आहे. तसेच हल्ल्यानंतर पर्यटकांनी या भागाकडे पाठ फिरवली आहे.
सबका हिसाब होगा! पहलगाम हल्ल्यानंतर अमित शाह आक्रमक; म्हणाले, “देशाला आश्वासन देतो की…”
1966 साली जेव्हा अमरनाथ यात्रेवर संकट ओढवले होते. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या विशिष्ट शैलीत एक विधान केले होते. जे नक्कीच आज पहलगामच्या हल्ल्यानंतर अनेकांना आठवले असेल. काय होते त्यांचे विधान? चला याबद्दल जाणून घेऊया.
काश्मीरमधील दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रा विस्कळीत करण्याची धमकी देत होते, तेव्हा बाळासाहेब ठाकरे आक्रमक झाले आणि म्हणाले की जर एकाही हिंदू अमरनाथ यात्रेकरूला इजा झाली तर मुंबईच नव्हे, तर देशातून हज यात्रेसाठी एकही विमान जाऊ देणार नाही. या धमकीनंतर, दहशतवादी घाबरले आणि पुढील 20-21 वर्षे अमरनाथ यात्रा सुरक्षितपणे पूर्ण झाली.