शेखर गोतसुर्वे, सोलापूर : आरटीओ कार्यालयाच्या सर्वव्हर सेवा ऑनलाइन केल्याचा गवगवा केला जात असला तरी मात्र प्रत्यक्षात कार्यालयात एजंटाचा सुळसुळाट दिसून आला आहे.आरटीओ कार्यालयामार्फत नागरिकांना वाहन परवाना, वाहन नोंदणी, वाहनावर कर्जाचा बोजा चढवणे व उतरवणे, कमर्शियल वाहन नोंदणी व दरवर्षी फिटनेस तपासणे, रिक्षा, स्कूल बस परवाने व फिटनेस, आकर्षक वाहन नंबर, वाहन परवाना नुतनीकरण अशा विविध सेवा दिल्या जातात. यापूर्वी या सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना आरटीओ कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत असत. कार्यालयातील साधा वाहन परवान्याचा अर्ज भरावायाचा असल्यास एजंटाची मदत घ्यावी लागत असे. त्यामुळे एजंट मंडळी मोटार वाहन निरीक्षकांचे नाव सांगून नागरिकांकडून वाटेल तितका पैसा उकळत असल्याच्या तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर तत्कालीन आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी आरटीओच्या सर्व सेवा ऑनलाईन केल्या. त्यामुळे आता नवीन वाहन नोंदणी वाहन विक्रेत्यांकडूनच होते तर नागरिकांना घरबसल्या वाहन परवानाच्या सेवा मिळू लागल्या आहेत. पण तरीही अनेक गोष्टींसाठी नागरिकांना आरटीओ कार्यालयात यावेच लागते. त्यासाठी आरटीओ कार्यालयात एक मदत कक्ष यापूर्वी उभारण्यात आला होता. आरटीओचे अर्ज मोफत उपलब्ध होण्यासाठी प्रवेशद्वारावरच संगणक बसवला होता. तत्कालीन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी नागरिकांना चांगली सेवा मिळावी, म्हणून अनेक उपाययोजना केल्या होत्या. हाच कित्ता संजय डोळे यांनी ही गिरवला होता. पण एक वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले. आरटीओ कार्यालयाच्या या सेवा रामभरोसे झाल्या आहेत. कार्यालयात आलेल्या नागरिकांना या सेवा घेण्यासाठी कोणताच मार्गदर्शन कक्ष नाही. त्यामुळे लोकांना एजंटाचा आधार घ्यावा लागत आहे. कार्यालयातील सर्व फायली एजंट मंडळीच हाताळत असल्याचे दिसून आले आहे. या
अधिकाऱ्यांचा अंकुश नाही
एजंट मंडळीवर अंकुश कोणाचा याचे उत्तर येथील अधिकाऱ्यांकडे नाही. कार्यालयात अधिकारीच वेळेवर उपलब्ध राहत नसल्याने अनेक फायली प्रलंबित असल्याच्या तक्रारी मोटार वाहन स्कूल चालकांनी केल्या.कार्यालयातील सर्व वारंवार बंद पडत असल्याने ऑनलाईन सेवा ठप्प होत असल्याचे चित्र अनेक वेळा पहावयास मिळाले.
[blockquote content=”उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड या कामानिमित्त बाहेर आहेत. आरटीओ कार्यालय व नांदणी चेकपोस्ट बाबतच्या तक्रारीबाबत मी सोमवारी त्यांच्याशी चर्चा करेन. ” pic=”” name=”-अमरसिंह गवारे, सहाय्यक परिवहन अधिकारी”]
एजंटांकडून अर्थिक लूट
परराज्यातील वाहन विक्री केलेल्या वाहनधारकांना नाहरकत प्रमाणपत्र हवे असल्यास या प्रमाणपत्रासाठी ३ ते ५ हजार रूपयांची मागणी केली जाते. वाहनांची डुप्लीकेट आरसी, वाहन ट्रान्सफर करण्यासाठी जादा रकमेची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी हाेत आहेत. त्यामूळे ऑनलाइन सेवा असल्या तरी जादा पैसे लोकाना मोजवे लागत आहेत.