Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar मध्ये तापमान ४० पार; उष्णतेच्या तडाख्याने जनजीवन विस्कळीत, रुग्णालयात ‘उष्माघात कक्ष’ सज्ज

अहिल्यानगर जिल्ह्यात तापमान ४० अंशांच्या पुढे गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात ‘उष्माघात कक्ष’ तयार ठेवण्यात आला असून प्रशासन सतर्क झाले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 16, 2026 | 03:25 PM
Ahilyanagar मध्ये तापमान ४० पार; उष्णतेच्या तडाख्याने जनजीवन विस्कळीत, रुग्णालयात ‘उष्माघात कक्ष’ सज्ज (फोटो सौजन्य-पोपट पिटेकर)

Ahilyanagar मध्ये तापमान ४० पार; उष्णतेच्या तडाख्याने जनजीवन विस्कळीत, रुग्णालयात ‘उष्माघात कक्ष’ सज्ज (फोटो सौजन्य-पोपट पिटेकर)

Follow Us
Follow Us:
  • अहिल्यानगरमध्ये तापमान ४० पार
  • उष्णतेच्या तडाख्याने जनजीवन विस्कळीत
  • रुग्णालयात ‘उष्माघात कक्ष’ सज्ज
पोपट पिटेकर, अहिल्यानगर : राज्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला असून, तापमानाचा पारा सातत्याने ४० अंश सेल्सिअसच्या वर जात आहे. वाढत्या उष्णतेमुळे जिल्ह्याभरातील जनजीवन अक्षरशः होरपळून निघाले असून, दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. या भीषण उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य प्रशासन सतर्क झाले असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्हा रुग्णालयात विशेष ‘उष्माघात कक्ष’ (Heatstroke Ward) कार्यान्वित करण्यात आला आहे.

दुपारच्या वेळी रस्ते ओस; जनजीवन प्रभावित

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. सकाळी १० वाजल्यापासूनच उन्हाच्या झळा लागण्यास सुरुवात होते, तर दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हाची तीव्रता अत्युच्च पातळीवर असते. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळल्याने शहरातील प्रमुख बाजारपेठा आणि रस्ते ओस पडत आहेत. शेतीकामांवरही याचा मोठा परिणाम झाला असून, मजूर आणि शेतकरी पहाटे किंवा सायंकाळी कामाला प्राधान्य देत आहेत.

“जनाची नाही तर मनाची तरी ठेवा” ; लोकदरबारात MMRDA अधिकाऱ्यांवर मंत्री प्रताप सरनाईकांचा संताप

आरोग्य प्रशासन सतर्क: जिल्हा रुग्णालयात विशेष सुविधा

वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

“जिल्ह्यातील वाढती उष्णता पाहता आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत. उष्माघात कक्षात थंड हवा, पुरेशी औषधे, ओआरएस (ORS) पाकिटे आणि आयव्ही फ्लुइड्सचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तातडीच्या उपचारांसाठी डॉक्टरांचे विशेष पथकही तैनात करण्यात आले आहे.”, अशी माहिती जिल्हा रुग्णालय तज्ज्ञ डॉ. श्रीकांत पाठक यांनी दिली.

तज्ज्ञांचा सल्ला आणि खबरदारीचे उपाय

जिल्हा रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉ. श्रीकांत पाठक यांनी नागरिकांना स्वतःचे संरक्षण करण्यासाठी खालील सूचना केल्या आहेत:

वेळेचे नियोजन: अत्यंत आवश्यक काम नसल्यास दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हात जाणे टाळावे.

पाण्याचे महत्त्व: तहान लागलेली नसली तरीही भरपूर पाणी प्यावे. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी ताक, लिंबू सरबत, नारळ पाणी यांसारख्या पेयांचा वापर करावा.

पेहराव: बाहेर पडताना फिकट रंगाचे, सैल सुती कपडे वापरावेत. डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर अनिवार्य करावा.

आहारावर नियंत्रण: पचनास जड असलेले किंवा तेलकट पदार्थ खाणे टाळावे.

ही लक्षणे दिसल्यास सावधान!

जर कोणाला तीव्र ताप, चक्कर येणे, मळमळणे, डोकेदुखी, जास्त घाम येणे किंवा शुद्ध हरपणे यांसारखी लक्षणे जाणवल्यास, तो उष्माघाताचा प्रकार असू शकतो. अशा वेळी रुग्णाला तातडीने सावलीत आणून थंड पाण्याने पुसावे आणि जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या जिल्ह्यात पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Maharashtra Legislative Council Election 2026 : महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकांचे बिगुल…! विधानपरिषदचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

Web Title: Ahilyanagar heatwave 40 degree heatstroke ward ready

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 03:25 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • heatwave
  • maharashtra

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
1

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
3

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
4

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.