1 वर्षांपूर्वीच कामाला मंजुरी मात्र श्रेयापायी अडकले 'या' बसस्थानाकचे काम
आमदार रोहित पवारांच्या (Rohit Pawar)पाठपुराव्यानंतर कर्जत मिरजगाव आणि जामखेड व खर्डा येथील बसस्थानकांचे सिमेंट काँक्रेटमध्ये कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या पाठपुरावातून मतदार संघातील कर्जत मिरजगाव आणि जामखेड व खर्डा येथील बसस्थानकांचे सिमेंट काँक्रेटमध्ये अस्तरीकरणाचे काम करण्याबाबत शासन दरबारी पाठपुरावा केला होता, त्याचाच एक भाग म्हणून जामखेड खर्डा व मिरजगाव या ठिकाणच्या बसस्थानकाचे अस्तरी करण्याचे काम पूर्ण झाले.
हे काम एक वर्षापासून तालुका कर्जत बस स्थानकाचे काम राजकीय श्रेयापायी अडकून पडले होते. परंतु, आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून बसस्थानकातील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे अस्तरीकरणाचे काम अखेर प्रत्यक्ष सुरू झाले आहे. मागील वर्षीच या कामाला मंजुरी मिळाली होती. मात्र, प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीला आता यश आल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Ahilyanagar News: माळीवाडा वेशीचा मुद्दा चिघळण्याची शक्यता; सत्ताधाऱ्यांच्या पत्राला विरोधकांचा आरोप
कर्जत येथील बस स्थानकाच्या उभारणीपासून आज तागायत प्रवाशांना बसस्थानक परिसरात प्रवाशांना उन्हाळ्यात धुळीचा आणि पावसाळ्यात चिखलाचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. या खराब अवस्थेमुळे अनेक वयोवृद्ध नागरिक चिखलात घसरून जखमी होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. तालुक्याचे ठिकाण असूनही बसस्थानक परिसराची अत्यंत दयनीय अवस्था होती. तांत्रिक अडचणी, तसेच या मतदारसंघातून अनेक वेळा निवडून येऊन तसेच मंत्रिपदही मिळाले परंतु या लोकप्रतिनिधीनी मातापुरतीच आश्वासनांची खैरात मांडली होती आणि निवडून गेल्यावरती विसरून गेले होते त्यांची उदासीनता आणि स्थानिक पुढाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कर्जत तालुक्याची ही परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा होती,
भविष्यात पुन्हा प्रवाशांची व वाहनांची पूर्वीसारखीच गैरसोय निर्माण होऊ नये, यासाठी आमदार रोहित पवार यांनी या कामात वैयक्तिक लक्ष घालावे. तांत्रिक अडचणी, तसेच या मतदारसंघातून अनेक वेळा निवडून येऊन तसेच मंत्रिपदही मिळाले परंतु या लोकप्रतिनिधीनी मातापुरतीच आश्वासनांची खैरात मांडली होती. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीला आता यश आल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पिंपरी-चिंचवडला अवकाळीचा तडाखा; कडाक्याच्या उन्हात कोसळल्या पावसाच्या सरी






