Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar : तारकपूर बस स्थानकात ज्येष्ठ नागरिकांचे हाल; स्मार्ट कार्डसाठी तासनतास रांगेत उभं राहण्याची वेळ

राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) सवलतीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले NCMC स्मार्ट कार्ड काढण्यात येत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 17, 2026 | 01:41 PM
Ahilyanagar : तारकपूर बस स्थानकात ज्येष्ठ नागरिकांचे हाल; स्मार्ट कार्डसाठी तासनतास रांगेत उभं राहण्याची वेळ
Follow Us
Follow Us:
  • तारकपूर बस स्थानकात ज्येष्ठ नागरिकांचे हाल,
  • स्मार्ट कार्डसाठी तासनतास रांगेत उभे राहण्याची वेळ
अहिल्यानगर/ पोपट पिटेकर : राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) सवलतीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले NCMC स्मार्ट कार्ड काढण्यात येत आहे. यासाठी अहिल्यानगरमधील तारकपूर बस स्थानकावर ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, प्रशासनाच्या नियोजित शून्य कारभारामुळे या ज्येष्ठ प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून, परिसरात नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

एकाच खिडकीवर भार, ज्येष्ठ नागरिक ताटकळत
सकाळपासूनच शेकडो ज्येष्ठ नागरिक स्मार्ट कार्डसाठी तारकपूर स्थानकात जमा झाले आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या नागरिकांसाठी महामंडळाने केवळ एकच काउंटर सुरू ठेवले आहे. एकाच खिडकीवर सर्व भार असल्याने काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे, परिणामी ज्येष्ठ नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे.

सुविधांचा अभाव: ना बसण्याची सोय, ना पिण्याचे पाणी

रांगेत उभे असलेले बहुतांश नागरिक हे 70 ते 80 वयोगटातील आहेत. वाढत्या उन्हाचा तडाखा आणि शारीरिक व्याधी असूनही प्रशासनाने त्यांच्यासाठी कोणतीही मूलभूत व्यवस्था केलेली नाही. बैठक व्यवस्थरांगेत उभे राहून थकलेल्या वृद्धांना बसण्यासाठी साधी बाके किंवा खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आलेली नाही. पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय उपलब्ध नसल्याने ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत.”आम्ही तासनतास या रांगेत उभे आहोत. सरकार सवलती जाहीर करते, पण त्या मिळवण्यासाठी आम्हाला अशा प्रकारे लाचार केले जात आहे. किमान पिण्याचे पाणी आणि बसण्यासाठी खुर्च्या तरी प्रशासनाने पुरवायला हव्या होत्या,” अशी संतप्त प्रतिक्रिया एका ज्येष्ठ नागरिकाने दिली.

वाई शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न चिघळला, प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिक हैराण

नागरिकांचा संताप आणि मागणी

प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. जर गर्दी जास्त आहे, तर तत्काळ अतिरिक्त काउंटर का उघडले जात नाहीत? असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे. जोपर्यंत प्रशासकीय यंत्रणा सुधारत नाही आणि ज्येष्ठांना सन्मानाची वागणूक मिळत नाही, तोपर्यंत अशा योजना केवळ नावापुरत्याच उरतील, अशी भावना व्यक्त होत आहे.प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन अतिरिक्त खिडक्या सुरू कराव्यात आणि ज्येष्ठांसाठी पाण्याची, बसण्याची सोय करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

वाई तालुक्यातील ‘धरणाखालचा रस्ता’ अर्धवट; नागरिकांत तीव्र संताप, आंदोलनाचाही इशारा

Web Title: Ahilyanagar plight of senior citizens at tarakpur bus station time to stand in queue for hours for smart cards

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 01:41 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान
1

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
2

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
3

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
4

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.