Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विठुरायाच्या वारीत आता आकाशातूनही आरोग्यसेवा; अत्यावश्यक रुग्णांसाठी एअर ॲम्बुलन्सची सुविधा – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

आषाढी वारीत यंदा प्रथमच अत्यावश्यक रुग्णांसाठी एअर ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली. वारीसाठी ३५३ रुग्णवाहिका, ४३ आयसीयू आणि ३ हजारांहून अधिक आरोग्य कर्मचारी तैनात राहणार आहेत.

  • By विवेक
Updated On: Jul 04, 2026 | 10:01 PM
विठुरायाच्या वारीत आता आकाशातूनही आरोग्यसेवा; अत्यावश्यक रुग्णांसाठी एअर ॲम्बुलन्सची सुविधा - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

विठुरायाच्या वारीत आता आकाशातूनही आरोग्यसेवा; अत्यावश्यक रुग्णांसाठी एअर ॲम्बुलन्सची सुविधा - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

Follow Us
Follow Us:

पंढरपूर /शिवाजी हळणवर : आषाढी वारीत लाखो वारकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य शासनाने यंदा प्रथमच अत्यावश्यक रुग्णांसाठी एअर ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करून देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आयोजित आरोग्य सुविधांच्या आढावा बैठकीत ही माहिती दिली.

मंत्री आबिटकर म्हणाले की, वारकरी घरातून वारीसाठी निघाल्यापासून ते सुखरूप घरी परतेपर्यंत आवश्यक त्या सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गर्दीच्या परिस्थितीत गंभीर रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी यंदा प्रथमच एअर ॲम्बुलन्सची सुविधा सुरू करण्यात येत असून, ही वारीसाठी मोठी आणि नावीन्यपूर्ण पायरी ठरणार आहे.

यंदाच्या वारीत ‘आरोग्य संपन्न वारी’ आणि ‘वारी सहाय्य’ या डिजिटल उपक्रमांद्वारे वारकऱ्यांना तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रत्येक आरोग्य कर्मचारी आणि आशा सेविकेमार्फत भाविकांना आवश्यक माहिती आणि मार्गदर्शन दिले जाणार आहे.

देहूनगर पंचायत पालखी सोहळ्यासाठी सज्ज; चाळीस कॅमेऱ्यांची नजर

वारीत आरोग्य सेवेसाठी पालखी मार्गावर ४३ ठिकाणी सुसज्ज आयसीयू, १५६ ठिकाणी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’, तसेच २१५ फिरते आरोग्य दूत कार्यरत राहणार आहेत. पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये १६ आयसीयू कक्ष व १७ तात्पुरते ‘आपला दवाखाना’ सुरू करण्यात येणार आहेत.याशिवाय पालखी मार्गावर ३५३ रुग्णवाहिका, बाईक ॲम्बुलन्स आणि आपत्कालीन आरोग्य सेवा सज्ज ठेवण्यात येणार आहेत. दिंडी प्रमुखांना प्राथमिक उपचार किटचे वाटप केले जाणार असून, ३,०८७ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच ३०२ तज्ज्ञ डॉक्टर वारी सेवेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत.

पंढरपूर शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये १० टक्के खाटा आरक्षित ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसेच वारकरी भाविकांच्या मोठ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये तीन दिवस विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

पालखी सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवड सज्ज; महापौर रवि लांडगे यांनी प्रशासनाला दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

बैठकीत आ. समाधान आवताडे यांनी २०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचे काम गतीने पूर्ण करण्याची मागणी केली. आ. राजू खरे यांनी पालखी मार्गावरील आरोग्य सुविधा आणि स्वच्छतेवर भर दिला. आ. अभिजीत पाटील यांनी ६५ एकर परिसरात विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्याची सूचना केली, तर नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी वारीनंतर संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याची मागणी केली.

बैठकीनंतर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन स्वच्छतेची पाहणी केली, रुग्णांशी संवाद साधला आणि उपलब्ध आरोग्य सुविधांची माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

Web Title: Air ambulance facility for ashadhi wari pandharpur prakash abitkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 10:01 PM

Topics:  

  • pandharpur
  • Pandharpur Ashadhi Wari
  • Prakash Abitkar
  • Vitthal Rukmini Mandir

संबंधित बातम्या

गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’; रुग्णालयनिहाय सुविधा निश्चित- मंत्री प्रकाश आबिटकर
1

गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’; रुग्णालयनिहाय सुविधा निश्चित- मंत्री प्रकाश आबिटकर

आरोग्य विभागाचे प्रशिक्षण धोरण जाहीर, प्रशिक्षण प्रणालीमध्ये अमुलाग्र बदल – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
2

आरोग्य विभागाचे प्रशिक्षण धोरण जाहीर, प्रशिक्षण प्रणालीमध्ये अमुलाग्र बदल – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

श्रीविठ्ठलाला विठोबा, पांडुरंग आणि विठूमाऊली का म्हणतात? जाणून घ्या लोकप्रिय नावांमागचा अर्थ
3

श्रीविठ्ठलाला विठोबा, पांडुरंग आणि विठूमाऊली का म्हणतात? जाणून घ्या लोकप्रिय नावांमागचा अर्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.