Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाडकी बहीण योजनेवरुन अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले; महिलांकडून पैसे परत…

लाडकी बहीण याेजनेत अपात्र ठरणाऱ्या महिलांकडून पैसे परत घेतले जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बाेलताना स्पष्ट केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 08, 2025 | 01:09 PM
लाडकी बहीण योजनेवरुन अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले; महिलांकडून पैसे परत...

लाडकी बहीण योजनेवरुन अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले; महिलांकडून पैसे परत...

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : लाडकी बहीण याेजनेत अपात्र ठरणाऱ्या महिलांकडून पैसे परत घेतले जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बाेलताना स्पष्ट केले. शुक्रवारी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे विविध बैठका पार पडल्या. यानंतर पत्रकार परीषदेत उपमुख्यमंत्री पवार यांनी लाडकी बहीण याेजनेबाबतची भुमिका स्पष्ट केली.

पवार म्हणाले, ‘‘ज्यावेळी लाडकी बहीण ही योजना आणली त्यावेळी अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ द्यायचा होता. परंतु या सगळ्या गोष्टी तपासण्यात आम्हाला वेळ कमी होता. आतापर्यंत ज्या कोणालाही पैसे देण्यात आलेले आहे त्यांचे पैसे परत घेतले जाणार नाही. पण आता ज्या महिलांकडे चार चाकी वाहन असतील, ज्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तसेच ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचे पैसे घेत असतील अशा महिलांना एकच योजनेचा लाभ भेटणार आहे आणि हे आधार कार्ड शी लिंक करण्यात येत असून पुढील कारवाई देखील करण्यात येणार आहे.’’

शिवभोजन थाळी बंद करणार असल्याबाबत विचारलं असता ते म्हणाले की अजून अर्थसंकल्प मांडला नाही. तुम्ही सांगता तेव्हा मला माहिती होत आहे. कपोकल्पित बातम्या आहेत अस काही निर्णय झालेला नाही, असं यावेळी अजित पवार म्हणाले

राहुल गांधीनी टीमकडून तपास करावा

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील मतदारांच्या यादीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्राच्या प्रौढ लोकसंख्येपेक्षा मतदार जास्त कसे आहेत, असा प्रश्नदेखील राहुल गांधींनी उपस्थित केला आहे. याबाबतच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘‘ राहुल गांधी यांनी त्यांची टीम नेमून तपास करावा. उद्या दिल्लीचा निकाल लागल्यावर जे हारतील ते असच आत्ता बोलतील हा रडीचा डाव असून, याला काहीच अर्थ नाही. जनता जनार्धन सर्वस्वी आहे. कार्यकर्ते निराश होऊ नये म्हणून आपल्याला मतदान मिळालं असल्याचं हे एक प्रयत्न आहे.’’ .

राज ठाकरे यांच्यावर टीका

राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेच्या बाबत अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की तुम्हाला तुमचा मुलगा निवडून आणता आला नाही आणि तुम्ही काय आम्हाला बोलता. लोकसभेत आम्हाला एक जागा मिळाली तेव्हा आम्ही रडत नाही बसलो अस म्हणत पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली

सोलापूरकर यांनी असे विधान करायला नको होते

अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या विधानाबाबत अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, राहुल सोलापूरकर यांच्याविरोधात पोलीसांकडे तक्रारी आल्या आहेत. राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराजाबद्दल असे विधान करायला नको होते. पोलीस त्याची तपासणी करून कारवाई करतील असं, यावेळी अजित पवार म्हणाले.

Web Title: Ajit pawar has made a big statement in pune on ladki bahin yojana nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2025 | 01:09 PM

Topics:  

  • ajit pawar
  • cmomaharashtra
  • Ladki Bahin Yojana
  • maharashtra
  • Maharashtra Goverment

संबंधित बातम्या

धाराशिव जलसंधारण विभागात कोट्यावधींचा भ्रष्टाचार, हिवाळी अधिवेशनात याला वाचा फुटणार?
1

धाराशिव जलसंधारण विभागात कोट्यावधींचा भ्रष्टाचार, हिवाळी अधिवेशनात याला वाचा फुटणार?

Palghar News : सरावलीतील गो ग्रीन इको टेक कंपनीवर कठोर कारवाई करा, पंकजा मुंडे यांना निवेदन
2

Palghar News : सरावलीतील गो ग्रीन इको टेक कंपनीवर कठोर कारवाई करा, पंकजा मुंडे यांना निवेदन

तुकडेबंदी सुधारणा विधेयकामुळे होणार ६० लक्ष कुटुंबांची मालमत्ता कायदेशीर – चंद्रशेखर बावनकुळे
3

तुकडेबंदी सुधारणा विधेयकामुळे होणार ६० लक्ष कुटुंबांची मालमत्ता कायदेशीर – चंद्रशेखर बावनकुळे

Nagpur Leopard : अखेर तीन दिवसानंतर बिबट्या जेरबंद, बेशुद्ध होऊन छतावरून कोसळला, नागपूरमध्ये बिबट्याला पकडण्याचा थरार Video समोर
4

Nagpur Leopard : अखेर तीन दिवसानंतर बिबट्या जेरबंद, बेशुद्ध होऊन छतावरून कोसळला, नागपूरमध्ये बिबट्याला पकडण्याचा थरार Video समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.