Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये रक्ताचा तीव्र तुटवडा; उष्णतेची लाट आणि सुट्ट्यांमुळे रक्तपेढ्या रिकाम्या

अहिल्यानगरमध्ये उष्णतेची लाट आणि सुट्ट्यांमुळे रक्तदानात घट झाली असून रक्तपेढ्यांमध्ये तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांच्या उपचारांवर परिणाम होत असून नागरिकांना रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात येत

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 25, 2026 | 11:53 AM
अहिल्यानगरमध्ये रक्ताचा तीव्र तुटवडा; उष्णतेची लाट आणि सुट्ट्यांमुळे रक्तपेढ्या रिकाम्या

अहिल्यानगरमध्ये रक्ताचा तीव्र तुटवडा; उष्णतेची लाट आणि सुट्ट्यांमुळे रक्तपेढ्या रिकाम्या

Follow Us
Follow Us:
  • अहिल्यानगरमध्ये रक्ताचा तीव्र तुटवडा
  • उष्णतेची लाट आणि सुट्ट्यांमुळे रक्तपेढ्या रिकाम्या
  • नागरिकांनी तातडीने रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन
पोपट पिटेकर, अहिल्यानगर : जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा मोठ्या प्रमाणावर वाढला असून, या कडाक्याच्या उन्हाचा फटका आता थेट आरोग्य व्यवस्थेला बसू लागला आहे. वाढत्या उष्णतेमुळे रक्तदान शिबिरांचे प्रमाण घटल्याने अहिल्यानगरमधील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा कमालीचा तुटवडा निर्माण झाला आहे. विशेषतः जनकल्याण रक्तपेढीमध्ये परिस्थिती चिंताजनक बनली असून, नागरिकांनी तातडीने रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महिन्याला १२०० पिशव्यांची गरज, साठा मात्र नगण्य

अहिल्यानगरच्या जनकल्याण रक्तपेढीमध्ये दरमहा सरासरी १००० ते १२०० रक्त पिशव्यांची आवश्यकता असते. यामध्ये अपघातातील रुग्ण, शस्त्रक्रिया आणि इतर गंभीर आजारांच्या रुग्णांचा समावेश असतो. मात्र, सध्याच्या परिस्थितीत रक्तपेढीत प्रत्येक रक्तगटाच्या केवळ दोन-दोन पिशव्या शिल्लक आहेत. रक्ताचा हा साठा अत्यंत कमी असल्याने आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांचे प्राण वाचवणे कठीण होऊ शकते.

Buldhana News: बुलढाण्याची राजकीय संस्कृती रसातळाला? संजय गायकवाडांनंतर मुलगा कुणाल गायकवाडांचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल

थायलसेमियाच्या रुग्णांपुढे संकट

रक्ताच्या या तुटवड्याचा सर्वाधिक फटका थायलसेमियाच्या रुग्णांना बसत आहे. या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना जिवंत राहण्यासाठी नियमित रक्ताची गरज असते. जनकल्याण रक्तपेढीला दरमहा थायलसेमियाच्या रुग्णांसाठी किमान १५० रक्त पिशव्यांची गरज लागते. रक्ताचा साठा उपलब्ध नसल्यामुळे या रुग्णांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

तुटवड्याची मुख्य कारणे

उन्हाची तीव्रता: वाढत्या उष्णतेमुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत, परिणामी रक्तदान शिबिरांना प्रतिसाद मिळत नाहीये.

शाळा-कॉलेजला सुट्ट्या: अनेक रक्तदान शिबिरे ही महाविद्यालयीन तरुणांच्या पुढाकाराने होतात, मात्र सध्या सुट्ट्या असल्यामुळे ही शिबिरे बंद आहेत.

लग्नसराई: लग्नसराईच्या गडबडीमुळे सामाजिक संस्थांकडून आयोजित केल्या जाणाऱ्या शिबिरांचे प्रमाण घटले आहे.

“सध्या रक्तपेढीमध्ये रक्ताचा साठा अत्यंत कमी झाला आहे. प्रत्येक रक्तगटाच्या केवळ दोनच पिशव्या शिल्लक आहेत. उन्हाळा, सुट्ट्या आणि लग्नसराईमुळे शिबिरे होत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांची गरज लक्षात घेता नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन रक्तदान करावे”, अशी माहिती जनकल्याण रक्तपेढीचे व्यवस्थापक सागर उंडे यांनी दिली.

तसेच जनकल्याण रक्तपेढीच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी या संकटकाळात माणुसकीच्या नात्याने रक्तदान करून रुग्णांना जीवदान द्यावे.

महाराष्ट्रात सर्वत्र पीएफ मलेरियाचा वाढता धोका! जागतिक मलेरिया दिनानिमित्त गंभीर प्रकारावर आरोग्य यंत्रणांनी दिला गंभीर इशारा

Web Title: Ahilyanagar blood shortage heatwave holidays blood banks empty news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 11:53 AM

Topics:  

  • Ahilyanagar
  • heatwave
  • maharashtra

संबंधित बातम्या

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
1

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर
2

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर

ऐन गणेशोत्सवातही फुलांचे भाव कोमेजले; अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत
3

ऐन गणेशोत्सवातही फुलांचे भाव कोमेजले; अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड
4

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.