Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विधानसभेपूर्वी अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार; महायुतीच्या गोटात नक्की चाललंय काय?

महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नसलातरी  भाजप160-170 जागा लढवू शकते, अशी शक्यता आहेत तर शिंदे गटाने 100 जागांची मागणी केली आहे. पण त्यांना जास्तीत जास्त 90 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर अजित पवार यांनी 80-90जागा मागितल्या आहेत. पण त्यांच्या वाट्याला केवळ 25-30 जागा मिळण्याची शक्यता आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 23, 2024 | 09:56 AM
Photo credit : Social media

Photo credit : Social media

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  महायुतीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. पण दुसरीकडे महायुतीत जागावाटपाच्या मुद्द्यावरून तीनही पक्षात वादाची ठिणगी पडण्यास सुरूवात झाली आहे. धक्कादायक म्हणजे अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढण्यासाठी तगडं प्लॅनिंग सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. जागावाटपचा मुद्द्यावरून त्यांच्यावर महायुतीकडून दबाव टाकला जात आहे.  एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे अजित पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.   

राज्य़ विधानसभा निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नसल्या तरी राजकीय पक्षांनी निव़डणुकीची तयारी सुरू केली आहे.महायुतीत जागावाटपावरून बैठकांचे सत्र सुरू आहे. कोण किती जागांवर निवडणूक लढणार, याबाबत वरिष्ठांमध्ये खलंबतं सुरू आहेत. पण जागावाटपाच्या  मुद्द्यावरून तीनही पक्षांमध्ये सातत्याने वाद होत असल्याचेही अनेकदा समोर आले  आहेत. अशातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने महायुतीतून बाहेर पडावे आणि स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी, यासाठी  भाजप आणि शिंदे गटाने प्लॅनिंग सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या  आवाजात सुरू आहेत. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

हेही वाचा: अजित पवारांना शह देण्यासाठी पडद्यामागे हालचालींना वेग; शरद पवार नाशिकमध्ये दाखल

 अजित पवारांच्या वाट्याला किती जागा येणार

अजित पवार जर निवडणुकीपर्यंत महायुतीत राहिले तर भाजप आणि शिवसेनेच्या वाट्यालाही कमी जागी येतील. पण जर  महायुतीतून बाहेर प़डले तर भाजप आणि शिंदे गटाला अधिकाधिक जागा लढवता येतील त्यामुळे आता या दोन्ही पक्षांनी  अजित पवार यांच्यावर दबाव टाकण्यास सुरूवात केल्याचे सांगितले जात आहे.

अजितदादा महायुतीतून बाहेर पडणार?

महायुतीकडून जितक्या जागा मिळतील तितक्याच जागा लढवल्यास ठीक पण अजित पावारांना तडजोड स्वीकारायची नसले तर महायुतीतून बाहेर पडून स्वतंत्र लढण्याशिवाय  त्यांच्याकडे दुसरा पर्याय राहणार नाही. इतकेच नव्हे तर, अजित पवारांच्या उमेदवारांच्या विरोधात भाजपच्या इच्छुकांनीही तयारी सुरू केल्याची माहिती आहे. त्यामुळे अजित पवार यांची चारही बाजूने कोंडी करण्यासाठी प्रयत्न केलेजात असल्याची चर्चाआहेत. त्यामुळे अपेक्षित जागावाटप न झाल्यास अजित पवारदेखील महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा:सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांच्या प्रयत्नांना यश, डिझेल तस्करीची केंद्र सरकारकडून दखल

शिंदे-भाजप- अजित पवार किती जागा लढवणार?

दरम्यान महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नसलातरी  भाजप160-170 जागा लढवू शकते, अशी शक्यता आहेत तर शिंदे गटाने 100 जागांची मागणी केली आहे. पण त्यांना जास्तीत जास्त 90 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर अजित पवार यांनी 80-90जागा मागितल्या आहेत. पण त्यांच्या वाट्याला केवळ 25-30 जागा मिळण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Ajit pawar to leave grand alliance before assembly nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2024 | 09:56 AM

Topics:  

  • ajit pawar
  • devendra fadanvis
  • Eknath Shinde
  • Mahayuti

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ
1

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….
2

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
3

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या
4

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.