Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: साताऱ्यात खळबळ! गर्भपातादरम्यान जन्मलेल्या बाळाचा उपासमारीने मृत्यू? हायकोर्टाचे चौकशीचे आदेश

सातारा जिल्हा रुग्णालयात गर्भपातादरम्यान जिवंत जन्मलेल्या ७५० ग्रॅमच्या बाळाचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी उपासमारीचा आरोप करत हायकोर्टात याचिका केली आहे, तर रुग्णालयाने आरोप फेटाळले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 19, 2026 | 09:04 PM
साताऱ्यात खळबळ! गर्भपातादरम्यान जन्मलेल्या बाळाचा उपासमारीने मृत्यू? (Photo Credit- X)

साताऱ्यात खळबळ! गर्भपातादरम्यान जन्मलेल्या बाळाचा उपासमारीने मृत्यू? (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • साताऱ्यात खळबळ! गर्भपातादरम्यान जन्मलेल्या बाळाचा उपासमारीने मृत्यू?
  • जिल्हा रुग्णालयावर गंभीर आरोप
  • हायकोर्टाचे चौकशीचे आदेश
सातारा : सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात गर्भपात प्रक्रियेदरम्यान जिवंत जन्मलेल्या अर्भकाला तब्बल १२ तास उपाशी ठेवून मृत्यू ओढवून आणल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी मृत बाळाची आई व कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. याचिकेनुसार, उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने ७ मार्च २०२६ रोजी गर्भपातास परवानगी दिली होती. त्यानुसार १७ मार्च रोजी सातारा जिल्हा रुग्णालयात गर्भपाताची प्रक्रिया करण्यात आली. मात्र, या प्रक्रियेदरम्यान बाळ जिवंत जन्माला आले. सकाळी सुमारे ११ वाजता जन्मलेल्या बाळाला रात्री १० वाजेपर्यंत, म्हणजे मृत्यू होईपर्यंत, दूध पाजण्यास परवानगी देण्यात आली नाही, असा आरोप रुग्णालय प्रशासनावर नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.

बाळाच्या आईने वारंवार विनंती करूनही “कोर्टाचा आदेश असल्यामुळे दूध पाजता येणार नाही” असे सांगत रुग्णालय प्रशासनाने नकार दिल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. यामुळे बाळाची उपासमार होऊन मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तसेच, संबंधित डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून, मानसिक धक्का बसलेल्या आईसाठी १० लाख रुपयांच्या नुकसानभरपाईचीही मागणी याचिकेत करण्यात आली आहे. दरम्यान, न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारला सविस्तर चौकशी करून उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ मार्च रोजी होणार असून, न्यायालय या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Satara Politics: सातारा जिल्हा परिषदेत सत्तेची ‘गुढी’ उभारणार कोण? अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग

सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून उपचारात कोणताही हलगर्जीपणा नाही

गर्भपात प्रकरणावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका अल्पवयीन गर्भवती महिलेच्या प्रसूती प्रकरणात रुग्णालयाने आपली बाजू स्पष्ट केली आहे. कमी दिवसांची डिलिव्हरी असल्याने कोर्टाच्या आदेशानुसार डिलिव्हरी करण्यात आली आहे. पोलीस केस असल्याने सर्व चाचण्या करून नातेवाईकांसमोर दिल्या आहे. त्यानंतर त्याची योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे.

“बाळाचे वजन केवळ ७५० ग्राम होते. अल्पवयीन मातेला हायपो थायरॉईडीझम होता. बाळाचे वजन अत्यंत कमी असल्याने आणि मातेची प्रकृती पाहता तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने सर्व वैद्यकीय प्रोटोकॉल पाळून उपचार केले आहे, बाळ कमी वयाचे असल्याने त्याला फीडिंग करता येत नाही. चमचा अथवा ड्रॉपरणे दूध पाजण्याचा प्रयत्न केला असता तर बाळ सिरीयस होण्याचा धोका होता त्यामुळे डॉक्टरांनी त्याच्यावर नियमानुसार उपचार केले आहेत. यात कोणताही हलगर्जीपणा झालेला नाही” या प्रकरणातील अहवाल कमिटीकडून मागवून न्यायालयात सादर करणार अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी दिली आहे.

Karad News: KYC न केल्यास पेन्शन बंद, कराडमधील ७११ लाभार्थ्यांना अंतिम इशारा; ३० मार्चपर्यंत आधार प्रमाणीकरण अनिवार्य

Web Title: Allegations of starving a live born infant for 12 hours high court orders inquiry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 09:04 PM

Topics:  

  • High court
  • Hospital
  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara : शशिकांत शिंदे यांची महेश शिंदे यांच्यावर बोचरी टीका
1

Satara : शशिकांत शिंदे यांची महेश शिंदे यांच्यावर बोचरी टीका

Satara News : “गोडोलीतील दारूच्या दुकानाला परवानगी दिल्यास न्यायालयीन लढा”, सामाजिक, माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरेंचा इशारा
2

Satara News : “गोडोलीतील दारूच्या दुकानाला परवानगी दिल्यास न्यायालयीन लढा”, सामाजिक, माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरेंचा इशारा

सातारा पोलिसांच्या निलंबनाला मंत्री जयकुमार गोरे यांचा विरोध, विधान परिषदेत शंभूराजे देसाई आणि जयकुमार आमने सामने
3

सातारा पोलिसांच्या निलंबनाला मंत्री जयकुमार गोरे यांचा विरोध, विधान परिषदेत शंभूराजे देसाई आणि जयकुमार आमने सामने

Satara News: सातारा पालिकेच्या रोखल्या घंटागाड्या, सोनगाव ग्रामस्थ आक्रमक, धुराचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची केली मागणी
4

Satara News: सातारा पालिकेच्या रोखल्या घंटागाड्या, सोनगाव ग्रामस्थ आक्रमक, धुराचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची केली मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.