Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ambenali Ghat Closed: अखेर आंबेनली घाट संपूर्ण वाहनांसाठी आज पासून चार दिवस बंद, पर्याय मार्ग वापरण्याचे आवाहन

मुसळधार पाऊस आणि दरड कोसळण्याच्या धोक्यामुळे पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाट ३ ते ७ जुलै २०२६ पर्यंत सर्व वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. प्रवाशांसाठी ताम्हिणी घाटाचा पर्यायी मार्ग सुचवला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 03, 2026 | 08:19 PM
अखेर आंबेनली घाट संपूर्ण वाहनांसाठी आज पासून चार दिवस बंद (Photo Credit- X)

अखेर आंबेनली घाट संपूर्ण वाहनांसाठी आज पासून चार दिवस बंद (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • अखेर आंबेनली घाट संपूर्ण वाहनांसाठी आज पासून चार दिवस बंद
  • पर्याय मार्ग वापरण्याचे आवाहन
  • वाचा संपूर्ण बातमी!
Ambenali Ghat News Marathi: अतिवृष्टी व पुढील चार दिवस मुसळधार पावसाने संकेत हवामान खात्याने दिल्याने घाट माथ्यावर दरडीचा सातत्य लक्षात घेता प्रवासी वर्गाच्या सुरक्षित साठी पोलादपूर सुरूर राज्य मार्गवरील आंबेनली घाटातील वाहतूक ३ जुलै २०२६ ते ७ जुलै २०२६ पर्यत सर्व वाहतुकी साठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी प्रसिद्धी पत्रक द्वारे दिले आहेत.

पोलादपूर आंबेनळी महाबळेश्वर राज्य महामार्ग हा सह्याद्री पर्वतरांगेतील अत्यंत संवेदनशील, भूस्खलनप्रवण, दरडप्रवण व उच्च जोखीम असलेल्या घाट विभागातून जात असून, सदर मार्गाची भौगोलिक, भूगर्भीय व हवामानविषयक वैशिष्ट्ये विचारात घेतल्यास पावसाळ्याच्या कालावधीत हा मार्ग सार्वजनिक वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक ठरतो.

सदर मार्गाचा मोठा भाग तीव्र उतार, खोल दऱ्या, नैसर्गिक जलप्रवाह, हवामानामुळे विदीर्ण झालेले बेसॉल्ट खडक, अस्थिर मातीचे थर, दाट वनक्षेत्र तसेच भूस्खलनास प्रवृत्त होणाऱ्या भूभागामधून जातो. भारतीय हवामान विभागाच्या नोंदीनुसार या परिसरात दरवर्षी अतिमुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून अनेक वेळा अल्प कालावधीत अत्यंत तीव्र स्वरूपाचा पाऊस नोंदविला जातो.

Ambenali Ghat crime : धक्कादायक! स्वतःच्या आजीचा खून करून मृतदेह घाटात फेकला; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

अतिवृष्टीमुळे उतारांची स्थिरता कमी होऊन मोठ्या प्रमाणावर भूस्खलन, दरड कोसळणे, दगड घसरणे व भूस्तर खचणे अशा घटना घडतात. अशा घटना कोणतीही पूर्वसूचना न देता घडण्याची शक्यता असल्यामुळे सार्वजनिक वाहतुकीवर गंभीर परिणाम होऊ शकतो.आठवड्या भरात दोन वेळा पोलादपूर हद्दीत मार्गवर दरड खाली आल्याने पुढील चार दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

सार्वजनिक सुरक्षिततेस प्राधान्य देत जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड यांच्याकडून वेळोवेळी घाटबंदीचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. अशा प्रतिबंधात्मक आदेशांमुळे संभाव्य जीवितहानी, वाहतूक अपघात व आपत्तीजन्य परिस्थिती मोठ्या प्रमाणात टाळता आलेली आहे. सध्या सदर महामार्गावर विविध सुरक्षा सुधारणा, संरक्षण भिंती, क्रैश बॅरिअर्स, ड्रेनेज सुधारणा व इतर सुरक्षाविषयक कामे प्रगतीपथावर असून अत्यंत प्रतिकूल हवामान परिस्थितीमध्ये नैसर्गिक आपत्तीचा धोका उदभवू शकतो. वरील सर्व बाबींचा विचार करता, सदर मार्ग हा पावसाळ्यामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने घाटबंदी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत घाट बंद च्या काळात पुणे सातारा कडे जाणाऱ्या प्रवासी वर्गाने महाड माणगांव ताम्हणी घाट किंवा पोलादपूर चिवळून कराड मार्गाचा वापर करावे असे सूचित केले आहेत.

कोकणातल्या रस्त्यांना बसला पावसाचा फटका, आंबेनळी घाटासह ‘या’ मार्गाने जाणं टाळा

Web Title: Ambenali ghat is finally closed to all vehicles for four days starting today motorists are urged to use alternative routes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 08:19 PM

Topics:  

  • Ambenali Ghat
  • Heavy Rain
  • mansoon

संबंधित बातम्या

Palghar Storm Rain : पालघरला वादळी पावसाचा मोठा फटका! घरांची पडझड, झाडे अन् वीजखांब कोसळले; संसार उघड्यावर
1

Palghar Storm Rain : पालघरला वादळी पावसाचा मोठा फटका! घरांची पडझड, झाडे अन् वीजखांब कोसळले; संसार उघड्यावर

ऑक्टोबर सुरु होताच अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पूर्व भारतातील भागांत गारपीटीचीही शक्यता
2

ऑक्टोबर सुरु होताच अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पूर्व भारतातील भागांत गारपीटीचीही शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.