धक्कादायक! स्वतःच्या आजीचा खून करून मृतदेह घाटात फेकला; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवकाने दोन दिवसांपूर्वी कौटुंबिक कारणातून किंवा अन्य वादातून आपल्या आजीचा खून केल्याचा संशय आहे. खून केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने मृतदेह आंबेनळी घाटातील खोल दरीत नेऊन फेकून दिला. दुर्गम भागात मृतदेह आढळल्याने सुरुवातीला पोलिसांसमोर ओळख पटवण्याचे आणि घटनेचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान होते. यावेळी प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम तसेच महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांनी धाडसी रेस्क्यू मोहीम राबवत खोल दरीत उतरून मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवले. या मोहिमेदरम्यान मोठी खबरदारी घेण्यात आली.
पहाटे महिलेच्या घरात गेला, पलंगावर पाडून तोंड दाबले अन्…; सिल्लोडमधील संतापजनक प्रकार
दरम्यान, तपासादरम्यान अलिबाग पोलिसांनी संशयाच्या आधारे संबंधित युवकाला ताब्यात घेतले. पोलिसी चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, मृतदेह ज्या ठिकाणी फेकण्यात आला होता ते ठिकाणही पोलिसांना दाखवून दिले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कौटुंबिक नात्यांमध्ये वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून हत्येमागील नेमके कारण, कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी आणि इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे.
काही दिवसांपूर्वीच या घाटात भीषण अपघात होऊन आठ युवकांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेची आठवण अद्याप ताजी असतानाच आता खून प्रकरण समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही आंबेनळी घाटातील याच परिसरात एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याची घटना घडली होती. त्यामुळे हा परिसर पुन्हा एकदा गूढ आणि गंभीर घटनांमुळे चर्चेत आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अलिबाग पोलीस करीत आहेत.
मोठी बातमी ! कुख्यात गुंड निलेश घायवळच्या भावाला राजस्थानातून अटक; 9 महिन्यांपासून होता फरार






