
पुणे शहरात जोरदार पावसाची हजेरी
पुण्यात मंदावला वाहतुकीचा वेग
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय
पुणे/सुनयना सोनवणे: पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसापासून पावसाने हजेरी लावली आहे. तर पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. गुरुवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस शुक्रवारी दिवसभर सुरू राहिल्याने शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले, तर वाहतुकीचाही वेग मंदावला होता.
हवामान विभागानुसार, वायव्य बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र अधिक सक्रिय होत असून त्याचा परिणाम राज्यासह पुणे जिल्ह्यावरही जाणवणार आहे. त्यामुळे पुणे शहरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे, जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता असून काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार, तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने पुण्याच्या घाटमाथ्यासाठी पुढील तीन दिवस रेड अलर्ट जारी केला आहे.
शहर आणि परिसरात शुक्रवारी (ता.३) कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. शनिवारी (ता.४) कमाल तापमानात विशेष बदल होणार नसून किमान तापमान २३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. सततच्या पावसाने सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच घाट परिसरात प्रवास करणाऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
पुणे जिल्ह्यातील पावसाची नोंद (मिमीमध्ये)
ठिकाण – पाऊस (मिमी)
भोर – २५.०
निमगिरी – २३.५
माळीण – १३.५
पाषाण – १३.२
एनडीए – १३.०
शिवाजीनगर – ११.६
दापोडी – ११.५
राजगुरूनगर – १०.५
Wardha flood alert : नदीकाठच्या २९३ गावांवर पुराचे सावट, २७ गावांचा संपर्क तुटण्याचा धोका!
चिंचवड – ८.०
बल्लाळवाडी – ७.५
लवळे – ५.५
शिरूर – ४.५
दुदुळगाव – ४.०
हडपसर – २.५
तळेगाव – २.०
गिरीवन – ०.५
नारायणगाव – ०.५
दौंड – ०.५
बारामती – ०.४
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर NDRF अलर्ट मोडवर
मान्सून २०२६ दरम्यान अतिवृष्टी आणि संभाव्य पुराचा धोका लक्षात घेता राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच एनडीआरएफ संपूर्णपणे अलर्ट मोडवर आले आहे. मान्सूनच्या काळात उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी एनडीआरएफच्या पुणे येथील ५व्या वाहिनीने महाराष्ट्र आणि गोव्यातील विविध संवेदनशील जिल्ह्यांमध्ये आपल्या तुकड्यांची पूर्वतैनाती केली आहे.