Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati जिल्ह्यात १५ महिन्यात ७०४ आगीच्या घटना, मार्च महिन्यात सर्वाधिक घटना; MIDC तील उपकेंद्र १० वर्षांपासून बंद

अमरावती जिल्ह्यात गेल्या १५ महिन्यांत ७०४ आगीच्या घटना घडल्या असून, मार्च महिन्यात सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. दरम्यान, एमआयडीसीमधील उपकेंद्र मागील १० वर्षांपासून बंद करण्यात आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 09, 2026 | 12:59 PM
Amravati जिल्ह्यात १५ महिन्यात ७०४ आगीच्या घटना, मार्च महिन्यात सर्वाधिक घटना; MIDC तील उपकेंद्र १० वर्षांपासून बंद (फोटो सौजन्य-ChatGPT)

Amravati जिल्ह्यात १५ महिन्यात ७०४ आगीच्या घटना, मार्च महिन्यात सर्वाधिक घटना; MIDC तील उपकेंद्र १० वर्षांपासून बंद (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • अमरावती जिल्ह्यात १५ महिन्यात ७०४ आगीच्या घटना
  • मार्च महिन्यात सर्वाधिक घटना
  • MIDC तील उपकेंद्र १० वर्षांपासून बंद
अमरावती : उन्हाळ्याची चाहूल लागताच आगीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले. महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने जानेवारी २०२५ ते मार्च २०२६ या १५ महिन्यांच्या कालावधीत शहर व परिसरातील एकूण ७०४ आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळवले आहे. या घटनांमुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला. विशेष म्हणजे २०२५ आणि २०२६ या दोन्ही वर्षांच्या आकडेवारीनुसार मार्च महिन्यात सर्वाधिक आगीच्या घटना घडल्या. मार्च २०२५ मध्ये १३१, तर मार्च २०२६ मध्ये १३९ आगीच्या घटना नोंदवण्यात आल्या. महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे मुख्यालय वाळकट कंपाऊंड येथील संकुलात आहे.

अतिवृष्टीमुळे हळद पिकाच्या उत्पादनात मोठी घट! उमरखेड-महागाव तालुक्यातील स्थिती; विविध रोगाचा प्रादुर्भाव

शहराचे वाढते कार्यक्षेत्र लक्षात घेता आपत्कालीन घटनांवर त्वरित नियंत्रण मिळवण्यासाठी तीन उपकेंद्रे कार्यरत आहेत. त्यामध्ये वाळगाव रोडवरील ट्रान्सपोर्टनगर, प्रशांतनगर येथील कार्यशाळा संकुल आणि बडनेरा येथील कनिष्ठ प्रादेशिक कार्यालय या ठिकाणी उपकेंद्रांचा समावेश आहे. या तिन्ही उपकेंद्रांवर २४ तास किमान दोन ते तीन पाण्याचे टँकर उपलब्ध असतात. आग लागल्याची माहिती मिळताच हे टँकर तत्काळ घटनास्थळी रवाना केले जातात. परिस्थिती गंभीर असल्यास इतर उपकेंद्रांमधूनही अतिरिक्त टैंकर मागवले जातात. औद्योगिक क्षेत्र असलेल्या एमआयडीसी संकुलातील अग्निशमन विभागाचे उपकेंद्र गत १० वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे त्या परिसरात आग लागल्यास वाळकट कंपाऊंड, प्रशांत नगर व बडनेरा येथूनच टैंकर पाठवावे लागतात. १६ मार्च २०२५ रोजी एमआयडीसीतील संजय ऑइल मिलमध्ये भीषण आग लागली होती. तेलासह मोठ्या प्रमाणावर गोण्या साठवून ठेवल्यामुळे आग झपाट्याने पसरली.

आगीत महिलेचा मृत्यू

महानगरपालिकेच्या टँकरमधील पाणी संपल्यावर एमआयडीसीमधून जाणाऱ्या एमजेपीएच्या मुख्य पाइपलाइनमधून टैंकर भरून आग विझवण्याची व्यवस्था करावी लागली होती. तसेच ६ जानेवारी २०२६ रोजी एका रासायनिक कारखान्यात लागलेल्या आगीत महिला कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनांनंतर एमआयडीसीतील अग्निशमन उपकेंद्र पुन्हा सुरू करण्याची मागणी पुढे आली. मात्र, महानगरपालिकेकडून अद्याप या संदर्भात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.

आगीच्या घटना व झालेल नुकसान

जानेवारी २०२५ – ५३
फेब्रुवारी – ४५
मार्च – १३१
एप्रिल – ७७
मे – ४७
जून – २५
जुलै – ७
ऑगस्ट – ५
सप्टेंबर – ७
ऑक्टोबर – ३५
नोव्हेंबर – २५
डिसेंबर – ३८
जानेवारी २०२६ – २८
फेब्रुवारी – ५२
मार्च-१३९
एकूण – ७०४

Amravati News : 102 टक्के पाऊस; तरीही ‘या’ जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट; वाढते तापमान आणि घटते भूजल

Web Title: Amravati 704 fire incidents 15 months midc substation closed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 12:59 PM

Topics:  

  • Accident
  • amravati
  • Fire News

संबंधित बातम्या

दहीहंडीच्या जल्लोषाला गालबोट; १६८ गोविंदा जखमी, थरावरून पडून एका गोविंदाचा मृत्यू, तर खांब कोसळून चिमुकल्याचा अंत
1

दहीहंडीच्या जल्लोषाला गालबोट; १६८ गोविंदा जखमी, थरावरून पडून एका गोविंदाचा मृत्यू, तर खांब कोसळून चिमुकल्याचा अंत

‘सर आम्हाला सोडून जाऊ नका…’; शिक्षकाचे ट्रान्सफर अन् मिठी मारून ढसाढसा रडले विद्यार्थी, Video Viral
2

‘सर आम्हाला सोडून जाऊ नका…’; शिक्षकाचे ट्रान्सफर अन् मिठी मारून ढसाढसा रडले विद्यार्थी, Video Viral

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव
3

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव

Iraq Blast : बगदादजवळ अल-डोरा पॉवर प्लांटमध्ये अज्ञात स्फोट; भीषण आग, आगीवर नियंत्रण
4

Iraq Blast : बगदादजवळ अल-डोरा पॉवर प्लांटमध्ये अज्ञात स्फोट; भीषण आग, आगीवर नियंत्रण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.