मुंबई: ठाकरे गटाचे आमदार, माजी मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी आमदार अनिल परब यांना अटकपूर्व जामीन (Anil Parab Pre Arrest Bail) मंजूर करण्यात आला आहे. कोरोनाकाळात मनीलॉन्ड्रीगचा (आर्थिक गैरव्यवहार) पैसा येथे गुंतवला असल्याचा आरोप अनिल परब यांच्यावर केला होता. रत्नागिरीतील खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जमीन मंजूर केला आहे, त्यामुळं आमदार अनिल परब यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
[read_also content=”फेरीवाल्यांच्या पदपथावरील वाढत्या अतिक्रमणावरून न्यायालयाचे पालिकेला खडेबोल https://www.navarashtra.com/maharashtra/court-slams-municipality-over-increasing-encroachment-on-footpath-by-hawkers-346438.html”]
दरम्यान, कोरोनाकाळात रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील मुरुड येथे साई रिसॉर्ट्चे अनाधिकृत बांधकाम केले आहे, तसेच मनी लॉन्ड्रीगचा पैसा येथे वापरला असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी केला आहे. तसेच याबाबत त्यांनी तक्रार दाखल करुन हे रिसॉर्ट तोडण्यासाठी कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर राज्य सरकारने देखील साई रिसॉर्ट्चे अनाधिकृत बांधकाम पाडण्यासाठी परवानगी दिली होती.
याप्रकरणी अनिल परब व अन्य दोन जणांविरुद्धआयपीसी भां.द.वि. ४२० अंतर्गत फसवणूक एफआयआर नोंदवून अखेर गुन्हा दाखल करण्यात होता. याप्रकरणी खेड सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अनिल परब यांनी अर्ज केला होता. आज परबांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे, त्यामुळं परबांना दिलासा मिळाला असून, ठाकरे गटातील संजय राऊतांपाठोपाठ आता अनिल परबांनाही दिलासा मिळाला आहे.