Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 31 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Annabhau Sathe Memorial: अण्णाभाऊंच्या विचारांचे जागतिक ‘ज्ञानपीठ’ उभारणार; फडणवीस-शिंदे यांची मोठी घोषणा

Annabhau Sathe Memorial: घाटकोपरच्या चिरागनगर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 31, 2026 | 06:40 PM
अण्णाभाऊंच्या विचारांचे जागतिक 'ज्ञानपीठ' उभारणार; फडणवीस-शिंदे यांची मोठी घोषणा

अण्णाभाऊंच्या विचारांचे जागतिक 'ज्ञानपीठ' उभारणार; फडणवीस-शिंदे यांची मोठी घोषणा

Follow Us
Follow Us:
  • ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था’ प्रकल्पाचे भूमिपूजन
  • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य-विचार हे कालजयी
  • संस्थेचे उदघाटन २०२९ साली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करणार
मुंबई: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe Memorial) यांच्या कर्मभूमी असलेल्या घाटकोपरच्या चिरागनगर येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) मार्फत उभारण्यात येणाऱ्या ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी जुलै 2029 मध्ये या संस्थेचे उद्घाटन करण्याचा शब्द देत, उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्याची घोषणाही केली.

अण्णाभाऊंचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य आणि विचार कालातीत असून आजच्या तरुणांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, कष्टकरी, शेतकरी आणि वंचित समाजासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करत त्यांनी अण्णाभाऊंच्या साहित्याचा 27 जागतिक भाषांमध्ये अनुवाद झाल्याची आठवण करून दिली.

2016 मध्ये घेतलेल्या निर्णयाला आता मूर्त स्वरूप

अण्णाभाऊ साठे यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी स्मारक उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर 2016 मध्ये हा निर्णय घेतला गेला. नंतर प्रकल्पाला गती देत पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण करून आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Mira Bhayandar News: लाखो नागरिकांच्या आरोग्याशी खेळ?; पाणी शुद्धीकरणासाठी एक्सपायरी केमिकल वापराचा दावा

20 मीटर उंच कांस्य पुतळा आणि अत्याधुनिक सुविधा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की हा प्रकल्प केवळ स्मारक नसून अण्णाभाऊंच्या विचारांचे जागतिक ज्ञानपीठ ठरेल.

या प्रकल्पात पुढील सुविधा उभारण्यात येणार आहेत:

20 मीटर उंच कांस्य पुतळा

‘फकिरा’ कादंबरीवर आधारित जगातील सर्वात मोठे पुस्तक शिल्प

आधुनिक ग्रंथालय

संशोधन व प्रशिक्षण केंद्र

कौशल्य विकास केंद्र

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र

डिजिटल ऑडिओ-व्हिज्युअल दालन

मुलांसाठी डिस्कव्हरी झोन

अण्णाभाऊंच्या 255 किमी पायी प्रवासाचे विशेष दालन

305 कोटींचा प्रकल्प

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सांगितले की, सुमारे 305 कोटी रुपये खर्चून 18 हजार चौरस मीटर जागेवर हा प्रकल्प दोन टप्प्यांत विकसित केला जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, साहित्य, संस्कृती आणि सामाजिक प्रेरणेचा संगम या संस्थेत पाहायला मिळणार आहे.

वाटेगावातही भव्य स्मारक

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या मूळ गावी वाटेगाव येथे 50 कोटी रुपयांच्या निधीतून भव्य स्मारक आणि पुतळा उभारण्याची घोषणाही केली. तसेच बार्टीच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेली ‘आर्टी’ (ARTI) संस्था सामाजिक न्याय, संशोधन आणि कौशल्य विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

समाजासाठी प्रेरणास्थान

कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. तसेच ‘पारदर्शकतेकडून परिवर्तनाकडे’ या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. या प्रकल्पामुळे अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देश-विदेशातील नव्या पिढीपर्यंत पोहोचेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

‘विकसित भारत 2047’ साठी नवोन्मेष आणि गुणवत्तेवर भर द्या; असोचॅमच्या व्यासपीठावरून पीयूष गोयल यांचे आवाहन

Web Title: Anna bhau sathe research training institute groundbreaking mumbai fadnavis shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 06:40 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

Shivsena Bow And Arrow Hearing: …तर शिंदे मुख्यमंत्री झालेच नसते!; सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा ठाकरे गटासाठी आक्रमक
1

Shivsena Bow And Arrow Hearing: …तर शिंदे मुख्यमंत्री झालेच नसते!; सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा ठाकरे गटासाठी आक्रमक

Bhiwandi Building Collapsed: भिवंडी दुर्घटनेवर सरकार ॲक्शन मोडमध्ये! दोषींवर कठोर कारवाईचे आदेश, मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत
2

Bhiwandi Building Collapsed: भिवंडी दुर्घटनेवर सरकार ॲक्शन मोडमध्ये! दोषींवर कठोर कारवाईचे आदेश, मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत

सुप्रीम कोर्टाकडून शिंदेसेनेच्या नेत्याला मोठा धक्का, थेट आमदारकी धोक्यात; नेमकं प्रकरण काय?
3

सुप्रीम कोर्टाकडून शिंदेसेनेच्या नेत्याला मोठा धक्का, थेट आमदारकी धोक्यात; नेमकं प्रकरण काय?

‘2 ते 4 वर्षात ड्रग्ज फ्री मुंबई…’, राज्य सरकारच्या नशामुक्ती अभियानाचा शुभारंभ; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
4

‘2 ते 4 वर्षात ड्रग्ज फ्री मुंबई…’, राज्य सरकारच्या नशामुक्ती अभियानाचा शुभारंभ; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.